उद्योगांसाठी खूशखबर... लवकरच मिळणार अतिरिक्त पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

५५ पैकी ३२ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण
औरंगाबाद - जालना आणि औरंगाबादेत असलेल्या उद्योगांसाठी आता अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ७२ एमएलडीची जलवाहिनी पूर्ण होणार असून ती चाचणीसह जून २०१८ पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यन्वित केली जाणार असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. 

५५ पैकी ३२ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण
औरंगाबाद - जालना आणि औरंगाबादेत असलेल्या उद्योगांसाठी आता अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ७२ एमएलडीची जलवाहिनी पूर्ण होणार असून ती चाचणीसह जून २०१८ पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यन्वित केली जाणार असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. 

औरंगाबादेत एमआयडीसीच्या विद्यमान ७२ एमएलडी पाण्याच्या लाईनमधून ६८ एमएलडी पाणी शहर, वाळूज आणि जुन्या शेंद्राच्या औद्योगिक वसाहतीला पुरवले जाते. सध्या असलेल्या कंपन्यांना हे पाणी पुरेसे असले तरी विस्तारीकरण लक्षात घेता औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (ऑरिक), ड्रायपोर्ट आणि जालन्यातील औद्यागिक वसाहतींसाठी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूण ५५ किलोमीटर लांबीची ही वाहिनी पैठणहून सुरू होत कचनेर मार्गे, भालगाव आणि शेंद्रा अशी टाकण्यात येत आहे. त्यातील ३२ किलोमीटरची वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल. चाचणी घेऊन ती जून २०१८ पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. 

वाळूज, औरंगाबादचे पाणी वाढणार
औरंगाबाद शहरालगत असलेल्या रेल्वे स्टेशन आणि वाळूज औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा नवी लाईन कार्यान्वित झाल्यावर वाढणार आहे. जुन्या लाईनवरील शेंद्रा आणि जालन्याला देण्यात येणारे पाणी बंद होऊन ते नव्या लाईनद्वारे देण्यात येणार आहे. ७२ एमएलडी पाण्यापैकी २० एमएलडी पाणी हे ऑरिकसाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित पाणी मागणीनुसार वितरित केले जाणार आहे. यामुळे ऑरिक, जुने शेंद्रा, ऑरिक आणि जालना वसाहती पाण्याने ‘मालामाल’ होणार आहेत.

डब्ल्यूटीपीचे कामही पूर्णत्वाकडे
पाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीलगत तयार करण्यात येणाऱ्या वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट (डब्ल्यूटीपी) कामही पूर्णत्वाकडे चालले आहे. हे कार्यान्वित झाल्यावर पाण्याचा पुनर्वापर होईल आणि ताज्या पाण्याची मागणीही घटणार आहे. दुष्काळ असतानाही औरंगाबादेत उद्योगांना पाणी कमी पडले नसल्याचे रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news water supply for business