‘यिन समर यूथ समिट’ची शहरात शुक्रवारपासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

औरंगाबाद - यशाच्या वाटा सहज दिसत नाहीत, त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या वाटा धुंडाळताना, कठोर परिश्रम घेताना स्मार्ट पाऊले टाकावी लागतातच. करिअरच्या असंख्य पर्यायातून निवडाल तो पर्याय यशस्वी करण्याची धमक आपल्यात निर्माण करावी लागते. हेच सर्व काही साध्य केलेले यशस्वी व्यक्‍तिमत्त्व तुमच्याशी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत. तरुणांनो, घडायचं... मग यावच लागेल ता. नऊ ते ता. अकरा जून रोजी होणाऱ्या ‘यिन समर यूथ समिट’ला!

युवकांसाठी ‘यिन’ करीत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’ चा प्रारंभ शुक्रवार (ता. नऊ) ते रविवार (ता. ११) सकाळी दहा वाजता येथील जेएनईसी महाविद्यालयातील आर्यभट्ट सभागृहात होत आहे. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क व एमजीएम महािवद्यालय यांच्या संयुक्त िवद्यमाने आयोजित ‘यिन समर यूथ समिट २०१७’ यामध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर सविस्तर चर्चा होईल. तीन दिवसांत होणाऱ्या विविध सत्रांमध्ये धनंजय मुंडे, पाशा पटेल, ॲड. असीम सरोदे, डॉ. आरतीिसंह, डॉ. पुरूषोत्तम भापकर, िवलास िशंदे, अमर हबीब, अंकुशराव कदम, दीपक शिखारपूरकर,  लाईप स्किलिंग तज्ज्ञ निलया मेहता, सक्ससेस फुल्ल बिझनेसमॅन जयसिंग चव्हाण, परीक्षातज्ज्ञ सुनील पाटील, स्टार्टॲप तज्ज्ञ वीटो, अल्बार्टो आदी नामवंत सहभागी होऊन सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील तरुणांना उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करीत शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी ‘समर यूथ समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहे. गेली दोन वर्षे ‘यिन’ ही शिबिरे आयोजित करीत आहे. शिबिर सलग तीन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत होईल.

Web Title: aurangabad news YIN summer yoth summit