औरंगाबादेत संतप्त नागरिकांनी ठोकले जलकुंभाच्या गेटला कुलूप

माधव इतबारे
शुक्रवार, 4 मे 2018

नागरिकांनी सिडको एन-पाच येथील पाण्याच्या टाकीच्या गेटला शुक्रवारी (ता. 4) कुलूप ठोकले. टँकरचा पाणी पुरवठाही बंद करण्यात आला.

औरंगाबाद - तब्बल चौथ्या दिवशी वाॅर्डात पाणी न आल्याने संतप्त झालेल्या गुलमोहर काॅलनी भागातील नागरिकांनी सिडको एन-पाच येथील पाण्याच्या टाकीच्या गेटला शुक्रवारी (ता. 4) कुलूप ठोकले. टँकरचा पाणी पुरवठाही बंद करण्यात आला.

औरंगाबाद शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. 3) गुलमोहर काॅलनी भागात पाणी पुरवठा होणे गरजेचे होते. मात्र शुक्रवारी सकाळीही पाणी न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सहा वाजता नगरसेवक शिवाजी दांडगाई यांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. यावेळी टँकर भरण्यात येत होते. आम्हाला चार दिवसानंतरही पाणी नाही मग टँकरला का देता? असा जाब विचारत नागरीकांनी सर्व टँकर बाहेर काढून गेटला कुलूप ठोकले. आजच पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In Aurangabad people locked the gate of the watercourse