पोलिस वसाहत निर्मितीपासून पोरकीच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

औरंगाबाद - टीव्ही सेंटर भागातील पोलिस वसाहतीत निर्मितीपासून डागडुजीच झाली नसून निविदा काढण्यात आल्यानंतरही अर्धवट कामे करून ठेवण्यात आली आहेत. दहा दिवसांपासून ड्रेनेज खोदून ठेवले मात्र कामेच होत नसून टॉयलेट, बाथरूमचीही तशीच अवस्था आहे. गळक्‍या इमारती व चोकअपने रहिवासी त्रस्त असून त्यांनी सोमवारी (ता. २६) अभियंता व कंत्राटदाराला घेराव घालून आपला रोष व्यक्त केला. 

टीव्ही सेंटर पोलिस वसाहतीची निर्मिती १९९४ ला झाली. रहिवाशांनी इमारतीच्या डागडुजीबाबत वारंवार निवेदने दिली. पाठपुरावा केल्यानंतर विकासकामांबाबत प्रशासन जागे झाले. बांधकाम विभागाकडून या वसाहतीच्या डागडुजीसाठी निविदा काढण्यात आली असून कामांनाही सुरवात झाली, असे स्थानिक सांगतात. दहा दिवस झाले पण चोकअप झाल्याने ड्रेनेज लाइन खोदून ठेवण्यात आली. त्यावर कोणतेही काम झाले नाही. खड्ड्यात लहान मुले पडून जखमी झाल्याचे प्रकार घडले. तसेच उघड्या ड्रेनेजमुळे दुर्गंधी पसरली असून स्थानिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

काळे कुटुंबीयांतील सदस्यांची यामुळे प्रकृती बिघडल्याची बाब स्थानिक रहिवाशांनी सांगितली. पाठपुराव्यानंतर बांधकाम विभागातून एक अभियंता व कंत्राटदार पोलिस वसाहतीत आले. त्यावेळी त्यांच्यावर रोष व्यक्त करून त्यांना घेराव घालण्यात आला. टॉयलेट-बाथरूम आणि ड्रेनेजचे काम एका कंत्राटदाराने पंधरा दिवसांपासून प्रलंबित ठेवले. त्यामुळे वसाहतीतील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

उपायुक्तांकडून पाहणी
पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी वसाहतीत पाहणी केली. या प्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून आवश्‍यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्‍वासन त्यांनी दिल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Web Title: aurangabad police quarter