वरुण, वज्र वाहन बनले नुसत्या शोभेच्या वस्तू!

मनोज साखरे
शुक्रवार, 18 मे 2018

औरंगाबाद - औरंगाबाद पोलिस दल अत्याधुनिक वाहने आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. दंगल हाताळण्याची संपूर्ण यंत्रणा सक्षम असताना, अकरा मे रोजी उसळलेल्या दंगलीत पोलिस प्रशासनाने आधुनिक वाहने आणि यंत्रणेचा वापरच केला नाही. परिणामी दंगलीचा भडका झाला व यात दोन जीव जाऊन कोट्यवधींचे नुकसान झाले.

दंगल परिस्थिती हाताळण्यासाठी, दहशतवादी हल्ला किंवा तत्सम परिस्थिती हाताळण्याची क्षमता असलेली अनेक वाहने, उपकरणे आणि यंत्रणा ‘डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’तर्फे (डीआरडीओ) निर्मित केलेली आहेत. त्यात दंगल नियंत्रणासाठी वज्र, वरुण, अँटिमाइन व्हेईकल्स या वाहनांचा सामावेश आहे. ही तीनही वाहने औरंगाबाद शहर पोलिस दलाकडे आहेत. परंतु ही वाहने दंगलीच्या पहिल्या दिवशी केवळ शोभेच्या वस्तू बनून राहिली. या यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले आहे; परंतु त्याचा वापर अकरा मे रोजी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत झाला नाही. परिणामी दंगल भडकतच गेली.

मिटमिट्यातही तेच घडले
कचराप्रश्‍नी मिटमिट्यातील हिंसक घटनेवेळीही अत्याधुनिक वाहने, यंत्रणेचा वापर झाला नाही. तेथे पोलिसांनी दंगेखारांप्रमाणेच दगडफेक केली. हा अनुभव गाठीशी असताना आताच्या दंगलीच्या स्थितीत पोलिसांकडे असलेल्या वरुण, वज्रसारख्या सक्षम यंत्रणेचा वापर झाला नाही. दोनवेळा पोलिसांकडून अशी चूक घडली.

पुरावे मिळण्यात अडचणी
जमावाला नियंत्रित करण्यासाठी ‘वरुण’ वाहनातून रंगमिश्रित पाण्याचा मारा होतो. पाण्याच्या प्रचंड माऱ्यामुळे जमाव पांगला जातो. पाण्यातील रंग लवकर अंगावरून निघत नाही. अंगावरचा घट्ट रंगच दंगेखोरांच्या दंगलीतील सहभागाची खात्री व पुरावा ठरतो. पण वापर न झाल्याने पुरावाही गेला.

Web Title: Aurangabad police team vehicles