औरंगाबाद - राजेंद्र जंजाळ यांची क्रांतीचौकात चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

औरंगाबाद - शहरात शहागंज, राजाबाजार येथे झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांची दंगलखोरांची धरपकड सुरु आहे. याविषयी चौकशीसाठी शिवाजीनगर येथील शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना मंगळवारी (ता.15) क्रांतीचौक पोलिसांनी बोलविले आहे. 

दरम्यान, शिवाजीनगर परिसरात ही माहिती मिळताच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी रात्रभर मोती कारंजा शहागंज, राजाबाजार येथे दंगल पेटली होती. यात शेकडो दुकाने जळून खाक झाली. या दंगलीत दोघांचा मृत्यू झाला. 

याविषयी रविवारी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासणी करत दंगलखोरांची धरपकड सुरु केली. याच प्रकारणाच्या चौकशीसाठी मंगळवारी सकाळी उपायुक्त, सहायक आयुक्त यांनी शिवाजीनगर येथील नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. 

चौकशीसाठी पोलिस शिवाजीनगरमध्ये आल्याचे कळताच शिवाजीनगर, भारतनगर, आनंदनगर येथील नागरिक रस्त्यावर उतरले. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, वातावरण चिघळू नये म्हणून बदोबस्त वाढवत दंगल नियंत्रक वाहने पाचारण करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आंबादास दानवे, माजी खासदार प्रदिप जैस्वाल शिवाजीनगर येथे दाखल झाले. आंबादास दानवे यांच्या वाहनामध्ये जंजाळ क्रांतीचौक पोलिस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले. दरम्यान ही माहिती कळल्यानंतर शिवाजीनगर व राजाबाजार येथे दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Aurangabad - Rajendra Janjal's at Kranti Chowk for police inquiry