...अन्‌ अब्दुलचे स्वप्न झाले बेचिराख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

औरंगाबाद - रमजानच्या शुभदिवशी त्यांना इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्य विक्रीच्या नव्या व्यवसायास सुरवात करायची होती. त्यासाठी सर्व तयारी केली. दुकानाचे कामही पूर्ण झाले. दुकानात हळूहळू ७० टक्‍के माल आणून लावला होता; मात्र शुक्रवारी (ता. ११) रात्री उसळलेल्या दंगलीत समाजकंटकांनी या नव्या व्यवसायाची सुरवात होण्यापूर्वीच दुकानाला आग लावली. पै-पै जोडून आणलेला माल काही तासांतच जळून राख होऊन त्यांचे स्वप्न बेचिराख झाले.

नवाबपुरा येथील अब्दुल राऊफ यांना  इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकान सुरू करायचे होते. त्यासाठी त्यांनी ३५ लाख रुपयांचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्य या दुकानात आणून ठेवले होते. रमजानमध्ये ते या दुकानाचे उद्‌घाटन करणार होते; मात्र दंगलीने घात केला आणि त्यांचा नवा व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच बंद झाला. त्यांनी या दुकानासाठी कर्ज घेतले होते. शिवाय नातेवाइकांकडूनही उसनवारी केली होती. दंगलखोरांनी दुकानाबरोबर इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे सर्व साहित्यही जाळून टाकले. एवढेच नाही, तर दुकानासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांचीही राखरांगोळी करण्यात आली. दोन गटांतील भांडणामुळे आमच्या आयुष्यभराच्या कमाईची राख झाल्याची भावना अब्दुल रऊफ यांनी व्यक्‍त केली.

मी व्यापारी आहे. त्यामुळे माझा सर्व धर्मीयांशी संबंध येतो. हिंदू आणि मुस्लिम दोघेही माझे ग्राहक आहेत. आमचे कुणाशीही वैर नाही; तरीही आम्हाला दंगलीत खेचण्यात आले आहे. मुला-बाळांना आम्ही वाचवले; मात्र ३५ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. याविषयी पोलिसही आमची तक्रार घेत नाहीत. आमच्या नुकसानीचा अजून पंचनामा झालेला नाही.
- अब्दुल रऊफ, दुकानमालक, नवाबपुरा. 

Web Title: aurangabad riot abdul shop burned