'दहा दिवसांपूर्वीच्या ठिणगीतून दंगलीचा भडका'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

औरंगाबाद - दहा दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या ठिणगीतून शुक्रवारी (ता. ११) रात्री मोठी दंगल भडकली. उफाळलेल्या हिंसाचारामागे अनेक कारणांची पार्श्‍वभूमी आहे, असे सांगत अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी ‘दंगलीच्या वेळी पोलिस वेळेत पोचले नाहीत, त्यांचा रिस्पॉन्स टाइम कमी पडला,’ अशी कबुली दिली.

दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर बिपीन बिहारी शनिवारपासून औरंगाबादेत तळ ठोकून आहेत. त्यांनी  घटनास्थळांची पाहणी करून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत दंगलीमागील विविध कारणांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

परिस्थिती नियंत्रणात येत असून दंगलीमागे अनेक कारणे आहेत. शहागंज भागात एका मुलाला फळविक्रेत्याने मारहाण केली होती. दोन्ही गट पोलिस ठाण्यात आल्यानंतर प्रकरण मिटले. त्यानंतर नळ कनेक्‍शनचे कारण समोर आले. एका भागात पाणी सोडले जाते तर दुसरीकडे नळ तोडले जात असल्याच्या रोषातून दंगल घडली असावी. मात्र, आता शांतता हळूहळू प्रस्थापित होत असून दंगेखोरांवर गुन्हे नोंदवले जात आहेत. 

अपर महासंचालक म्हणाले...
चार पोलिस अधिकारी, पंधरा कर्मचारी जखमी
गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती नाजूक आहे. श्‍वसनास त्रास होत आहे.
प्लॅस्टिक बुलेट्‌स लागल्यावर अति रक्तस्राव झाल्यास मृत्यू संभव
मुलाच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी होणार
राजकीय हस्तक्षेप आहे का, याचा तपास केला जाणार
पोलिसांनी दक्ष राहावे, शांततेसाठी नागरिकांची हवी मदत

शहागंजमध्ये दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या प्रकरणी लोक पोलिस ठाण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी काय पवित्रा घेतला होता, याची चौकशी होणार. अहवालानंतर दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. विशेषत: पोलिस वेळेत पोचले नाहीत, पहाटे सहापर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही.
- बिपीन बिहारी, अपर पोलिस महासंचालक.

Web Title: aurangabad riot Controversy erupts riot says bipin bihari