दंगलीत जखमी झालेल्या एसीपी कोळेकरांना मुंबईला हलविले

प्रकाश बनकर
सोमवार, 14 मे 2018

गेल्या तीन दिवसापासून कोळेकर यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या दगडफेकीत त्यांच्या घशावर मार लागला यात त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर इजा झाली होती. शुक्रवारी रात्री त्यांना कृत्रिम श्‍वात्सोत्वास देण्यात आला होता.

औरंगाबाद : मोतीकारंजा येथे दंगलग्रस्त भागात परिस्थिती हाताळताना दगडफेकीत जखमी झालेल्या सहायक पोलिस आयुक्‍त गोवर्धन कोळेकर यांन पुढील उपचारासाठी सोमवारी (ता.14) एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला पाठविण्यात आले. दगडफेकीत कोळेकर यांच्या घशाला गंभीर इजा झाली होती. दोन दिवस त्यांच्यावर औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार बॉम्बे हॉस्पीटल मध्ये होणार असल्याचे पोलिस उपायुक्‍त विनायक ढाकणे यांनी "सकाळ'ला सांगितले.

गेल्या तीन दिवसापासून कोळेकर यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या दगडफेकीत त्यांच्या घशावर मार लागला यात त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर इजा झाली होती. शुक्रवारी रात्री त्यांना कृत्रिम श्‍वात्सोत्वास देण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी (ता.12) त्यांच्या घशावर शस्त्रक्रीया करण्यात आली. यामूळे त्यांची प्रकृतित सुधार होईल असे डॉक्‍टरांना वाटले होते.

मात्र, उपचारास त्यांनी प्रतिसाद न मिळाल्याने रविवारी (ता.13) त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्याची निर्णय घेण्यात आला. सोमवारी(ता.14) या खाजगी रुग्णालयातून त्यांना चिकलठाणा विमानतळावर आणण्यात आले. मुंबईहून आलेले एअर ऍम्ब्युलन्स (व्हीटीआरएसएल) सकाळी नऊ वाजता विमानतळावर आले. बॉम्बे हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी 9.43 ला पाठविण्यात आले. असेही ढाकणे यांनी सांगितले. 

Web Title: Aurangabad riot injured ACP Govardhan Kolekar shifted to Mumbai