पेटवापेटवी अन्‌ खच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

औरंगाबाद - दंगलीत शहाबाजार, राजाबाजार, कुंवारफल्ली, नवाबपुरा, गांधीनगर, मोतीकारंजा येथील बरीच दुकाने दंगेखोरांनी पेटविली. तसेच संस्थान गणपती ते नवाबपुरादरम्यान अनेक दुकानांची शटर्स उचकटून इलेक्‍ट्रॉनिक्‍ससह वस्तूंची लूट करण्यात आली.  

राजाबाजारमध्ये दगडांचा खच
नवाबपुराकडून राजाबाजारच्या दिशेने दंगेखोरांनी दगड, विटा, फरश्‍यांचे तुकडे आणि दारूच्या बाटल्या फेकल्या. रात्रभर हा प्रकार सुरूच होता. रस्त्यावर पाऊण फुटांचा खच पडला होता. दगडफेकीत घरांचे नुकसान झाले. दगडफेकीची तीव्रता इतकी होती की, भिंतीवर भोके पडले आहेत. असाच दगडांचा खच शहाबाजार परिसरातही आहे.

पोलिसांची नागरिकांकडून सोय
राजाबाजार परिसरात दंगलीचे लोण अधिक होते. तथापि, जीव मुठीत घेऊन घरात बसलेले लोक येथे असणाऱ्या पोलिसांना सहकार्य करत आहेत. 

चहा, नाष्टा यासोबत विश्रांतीसाठी घरातील साहित्य बसण्यासाठी देत आहेत. काही जणांनी त्यांची सकाळी अंघोळीचीही सोयदेखील केली.

मोबाईल इंटरनेट बंद
मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजारसह इतर ठिकाणी झालेल्या दंगलीनंतर अफवांचे पीक पसरू नये म्हणून औरंगाबादेतील इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. या घटनांचे सोशल मीडियावरून फोटो, व्हिडिओ आणि अफवा पसरविल्या जात आहेत. अफवांमुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते, अशी शक्‍यता आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला. ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद राहील, असे आयुक्त भारंबे यांनी सांगितले.

Web Title: Aurangabad riots