अमावास्या संपल्यानंतरच महापौरांनी केले बसचे पूजन

माधव इतबारे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

औरंगाबाद: स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू होणारी शहर बससेवा गेल्या वर्षभरापासून चर्चेत होती. अखेर शुक्रवारी (ता. सात) पहिली बस शहरात दाखल झाली आहे. शुक्रवारी दुपारी अमावास्या संपल्यानंतरच मेंटॉर तथा गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार शंभर बस खरेदीसाठी टाटा कंपनीची निविदा अंतिम करण्यात आली होती. बससेवेसाठी महापौरांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या. मात्र, पहिली बस शहरात येण्यासाठी अखेर डिसेंबर उजाडला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी 30, तर तिसऱ्या टप्प्यात 40 बस कंपनीतर्फे दिल्या जाणार आहेत. दरम्यान, एकाच बसची तांत्रिक तपासणी केलेली असल्याने व शनिवारी (ता. आठ) वर्धापनदिन असल्याने कंपनीने ही बस महापालिकेच्या ताब्यात दिली. शुक्रवारी अमावास्या असल्याने महापौरांनी बसचे पूजन एक दिवस पुढे म्हणजे शनिवारी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्मार्ट सिटीचे मेंटॉर सुनील पोरवाल शुक्रवारी बैठकीसाठी शहरात आले होते. त्यांच्या हस्ते अमावास्या संपल्यानंतर दुपारी फुले, फुग्यांनी सजविलेल्या बसचे पूजन करण्यात आले.

बसमधील सुविधा
बसमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यात सीसीटीव्ही कॅमेरा, पुढील थांब्याची माहिती देण्यासाठी डिजिटल डिस्प्ले, दोन अग्निरोधक, पॅनिक बटन, साउंड सिस्टीम अशी यंत्रणा आहे.

Web Title: aurangabad smart city bus service