औरंगाबाद : जुन्या योजनेची कामे घुसडली नवीन योजनेतही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेतील स्मार्ट वॉटर प्रकल्पाअंतर्गत जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेतील आवश्‍यक असलेली आठ प्रकारची दुरुस्ती व सुधारणांची कामे केली जाणार आहेत. यासाठी सुमारे 18 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे; मात्र ही कामे नवीन जलयोजनेतही घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जलयोजनेचा डीपीआर तपासूनच पंपखरेदी करून कामे करावीत, अशा सूचना प्रभारी आयुक्तांनी महापालिकेला दिल्या आहेत.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र होलाणी यांना शहरातील वितरण व्यवस्थेचा अभ्यास करून त्याचे नियोजन करत, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अहवाल देण्याचे काम दिले होते. त्यानुसार त्यांनी सुरवातीला ज्युबली पार्क, शिवाजीनगर, गारखेडा येथील जलकुंभ, नवीन पंप, तसेच काही जलवाहिन्यांची कामे प्रस्तावित करीत 10 कोटींचा प्रस्ताव दिला होता.

हेही वाचा ः उपाययोजना बंद, अपघात सुरू 

महापालिका प्रशासनाने यात आणखी काही अत्यावश्‍यक कामांची वाढ करत सुमारे 18 कोटींची कामे स्मार्ट सिटी योजनेत वळती केली आहेत. यामुळे सुमारे 30 एमएलडी पाणी वाढेल, असा महापालिकेचा दावा आहे. याकरिता औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिल्यानंतर या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली; मात्र त्यास प्रतिसादच मिळाला नाही. आता पुन्हा दुसऱ्यांदा काढलेल्या निविदेत केवळ आठ कामांपैकी केवळ वाहिन्या टाकण्यासाठी लागणाऱ्या पंपखरेदीसाठी निविदा दाखल झाल्या आहेत. बाकी सात कामांसाठी एकही निविदा दाखल झालेली नाही. 
  
एमजेपीकडील डीपीआर तपासणार 
प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत नवीन जलयोजनेतही ही कामे प्रस्तावित असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून (एमजेपी) जलयोजनेचा डीपीआर तपासण्याची सूचना केली. जलयोजनेच्या डीपीआरमध्ये नेमक्‍या 500 मि.मी. की 300 मि.मी. यापैकी कोणत्या व्यासाचे पंप बसवायचे आहेत, याची तपासणी करूनच त्यानुसार पंपाची खरेदी करा, अशी सूचना केली असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. 

हेही वाचा : प्रबोधनकार ते आदित्य, ठाकरे कुटुंबातील चौथी पिढी काय करते? वाचा.... 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Smart Water Project