मध्यवर्ती बसस्थानकासमोर कचऱ्याचा आगडोंब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

औरंगाबाद - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्याची जाळपोळ करण्याचे प्रकार मंगळवारीही (ता. १७) थांबलेले नव्हते. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मैदानावर टाकलेला सुमारे २५ ट्रक कचरा पेटवून देण्यात आल्याने परिसरात धुराचे उंचच उंच लोट उठले. या धुरामुळे वाहनांना रस्ता दिसेनासा झाला. 

औरंगाबाद - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्याची जाळपोळ करण्याचे प्रकार मंगळवारीही (ता. १७) थांबलेले नव्हते. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मैदानावर टाकलेला सुमारे २५ ट्रक कचरा पेटवून देण्यात आल्याने परिसरात धुराचे उंचच उंच लोट उठले. या धुरामुळे वाहनांना रस्ता दिसेनासा झाला. 

बसस्थानकासमोरील टॅक्‍सी स्टॅंडच्या मैदानात महापालिकेने तब्ब्ल २५ ट्रक कचरा उतरविला होता. हा कचरा मंगळवारी दुपारी दीडच्या सुमाराला पेटवून देण्यात आला. कचरा मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि त्यामुळे परिसरात धुराचे लोट उठले. बसस्थानकात हे धुराचे लोट पसरल्याने अनेक प्रवाशांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांना या धुराचा त्रास सहन करावा लागला. 

श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने वेगात पुढे सरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनांना धुरामुळे रस्ताही दिसेनासा झाला होता. त्यामुळे अनेक वाहनधारक दिवसा रस्त्यावर लाईट सुरू ठेवून वाहने चालवीत होते. पदमपुरा येथील अग्निशमन यंत्रणेकडील बंब अन्यत्र कर्तव्य बजावीत असल्याने सेव्हनहिल येथील केंद्राहून आग विझविण्यासाठी बंबाला पाचारण करण्यात आले. हा बंब येण्यासाठीचे अंतर अधिक असल्याने आगीची व्याप्ती वाढत गेली होती. 

कचऱ्याच्या धुराचे परिणाम गंभीर 
कचरा जाळला गेला तर त्याचा धूर वरपर्यंत न जाता श्‍वासोच्छ्वासासाठी वापरल्या जाणाऱ्या वायूत तो थांबून राहतो आणि पर्यायाने मनुष्याच्या फुफ्फुसात पोचतो. यातून खोकला, क्षीण वाटणे, दमा आणि श्‍वसनाचे अजार होण्याची शक्‍यता बळावते. सुमारे दीडशे ग्रॅम पीव्हीसी प्लॅस्टिकमधून निघणारा हायड्रोजन क्‍लोराईड गॅस एका माणसाची श्‍वसन प्रक्रिया बंद पाडण्यास पुरेसा आहे. जास्तीची हवा आत खेचणाऱ्या चिमुकल्यांच्या शरीरात विषारी वायू अधिक प्रमाणात जातो.

Web Title: aurangabad st bus station garbage fire

टॅग्स