...तर झाडे तोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी फटके दिले असते! - शरद पवार

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

अंकुशराव कदम यांना पर्यावरणाची आस्था आहे. त्यांनी त्यासाठी अनेकवर्ष हातभार लावला. महापालिकेला बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे करायचे, याचा आनंद आहे. मात्र, एवढी झाडे तोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी फटके दिले असते.

औरंगाबाद - शिक्षणसंस्थाचा परिसर हिरवा असावा, या भावनेतून पर्यावरणाच्या रक्षणासाठी एमजीएमचे विश्‍वस्त अंकुशराव कदम यांनी दूरदृष्टीतून वृक्ष लावगड केली आणि महापालिकेनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ती झाडे तोडली. जर बाळासाहेब असते तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके दिले असते, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महापालिकेसह शिवसेनेच्या नेत्यांचे कान टोचले. 

एमजीएम विद्यापीठाचे कुलपती शिक्षणमहर्षी अंकुशराव कदम यांनी नुकतीच वयाची 75 वर्षे पूर्ण केली. यानिमित्त शुक्रवारी (ता.20) सकाळी अकरा वाजता एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात अमृतमहोत्सव गौरव सोहळा पार पडला. श्री. पवार यांच्या हस्ते श्री. कदम, पत्नी अनुराधा कदम यांचा सत्कार झाला. त्यावेळी श्री. पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली.

हेही वाचा : पवार साहेब, फडणवीसांचे सरकार घालविल्याबद्दल अभिनंदन 

तत्पूर्वी माजी मंत्री तथा एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी आपल्या मनोगतात बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापालिकेनी झाडे तोडली. तेंव्हा सर्वात मोठ्या झाडालाच बाळासाहेबांचे नाव दिले असते तर, अशी कल्पना अंकुशराव यांनी माझ्यासमोर ठेवली होती, असे नमुद केले. हाच धागा पकडत श्री. पवार म्हणाले,

अंकुशराव कदम यांना पर्यावरणाची आस्था आहे. त्यांनी त्यासाठी अनेकवर्ष हातभार लावला. महापालिकेला बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे करायचे, याचा आनंद आहे. मात्र, एवढी झाडे तोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी फटके दिले असते. त्यांचा मला जवळून अनुभव आहे. शक्‍य असेल तर उद्याण की पुतळा हे काम एमजीएमवर सोपवा. जर हे काम त्यांनी केले तर लोक पाहायला येतील.

क्‍लिक करा : सिंचन गैरव्यवहारातून अजित पवार यांची सुटका ; काय घडले? 

यासाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुढे यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते. यानिमित्त शिल्पकार या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. डॉ. अशोक नाईकवाडे, प्रा. डॉ. रेखा शेळके यांनी ग्रंथाचे संपादन केले आहे.

श्री. कदम यांच्याशी संबंधित राज्यातील अनेक मान्यवरांचे लेख आहेत. नीलेश राऊत यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रास्ताविक आमदार विक्रम काळे यांनी केले. मंचावर रंगनाथ काळे, आमदार सतीश चव्हाण, कैलास पाटील, अनिल पटेल उपस्थित होते. 

हे वाचलंत का?- बोक्याने फोडली हॉटेलची काच; पोलिसांनी केली अटक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Then Balasaheb Thakare Thrashed The One Who Fell Trees - Sharad Pawar