पवार साहेब, फडणवीसांचे सरकार घालविल्याबद्दल अभिनंदन 

अतुल मेहरे 
Wednesday, 18 December 2019

निकालानंतर सर्वप्रथम जेव्हा दिल्लीला संसदेत पोहोचलो, तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते "आपल्याकडे कुणी बघत तर नाही आहे ना? याची खात्री करून माझ्याशी बोलत होते. काहींनी तर माझे दोन्ही हा पकडून अभिनंदनाची मुद्रा केली. अशापद्धतीने भाजप नेते माझे अभिनंदन करत होते, असे गुपित शरद पवारांनी आज पत्रकारांसमोर उघड केले. हा संपूर्ण किस्सा सांगताना शरद पवार यांनी नक्कल देखील करून दाखवली, हे विशेष. 

नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वप्रथम जेव्हा दिल्लीला संसदेत पोहोचलो, तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते "आपल्याकडे कुणी बघत तर नाही आहे ना? याची खात्री करून माझे अभिनंदन करत होते, असे गुपित शरद पवारांनी आज "देवगिरी' बंगल्यावर उघड केले. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांची नक्कल देखील करून दाखविली. 

नागपुरात सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार नागपुरात दाखल झाले. या दोनदिवसीय दौऱ्यादरम्यान त्यांचा मुक्काम "देवगिरी' या शासकीय बंगल्यावर आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास पवारांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी दिलखुलासपणे चर्चा केली. चर्चेदरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतरच्या दिल्ली दौऱ्याचा किस्सा सांगितला. 

निकालानंतर सर्वप्रथम जेव्हा दिल्लीला संसदेत पोहोचलो, तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते "आपल्याकडे कुणी बघत तर नाही आहे ना? याची खात्री करून माझ्याशी बोलत होते. काहींनी तर माझे दोन्ही हा पकडून अभिनंदनाची मुद्रा केली. अशापद्धतीने भाजप नेते माझे अभिनंदन करत होते, असे गुपित शरद पवारांनी आज पत्रकारांसमोर उघड केले. हा संपूर्ण किस्सा सांगताना शरद पवार यांनी नक्कल देखील करून दाखवली, हे विशेष. 

अधिक माहितीसाठी - #NagpurWinterSession : राजकीय भूकंप होणार, एकनाथ खडसे देणार भाजपला धक्का?

मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर 
शरद पवार यांना राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता, अधिवेशन संपल्यानंतर दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे ते म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे विदर्भावर देखील लक्ष केंद्रित केले असते तर येथूनही आमच्या जागा निश्‍चितपणे वाढल्या असता, असेही पवार म्हणाले. 

महत्त्वाची बातमी - "नहले पे दहला' : गरिबांसाठी ठाकरे सरकार करणार हे

सोशल मीडिया बंदी कायदा रोखणार 
केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयककानंतर सोशल मीडिया बंदी कायदा करण्याचा निर्धार केला आहे. हा कायदा सर्वसामान्य भारतीयांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याने या कायद्याला रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर येथे केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader congratulated me at delhi] says sharad pawat at nagpur