वाळूजजवळ भीषण अपघात ; 2 महिला ठार, 10 जखमी

आर. के. भराड
बुधवार, 25 एप्रिल 2018

जीकठाण प्राथमिक आरोग्य केंद्राची सरकारी रूग्णावाहिका 102 मध्ये चालक रवींद्र रावसाहेब गोरे हा भेंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित महिलांचे लेप्रोस्कोपी कुटुंबकल्याण ऑपरेशन कॅम्पच्‍या महिलांना घेऊन घरी जात होता.

वाळूज : प्राथमिक आरोग्य केंद्राची सरकारी रुग्णावाहिका व प्रवाशी वाहतूक करणारी खाजगी ट्रॅव्हल्सची बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन महिला ठार तर एका मुलासह दहा महिला जखमी झाल्या. अपघातातची ही भीषण घटना वाळूज जवळील जीकठाण फाटा येथे बुधवारी (ता.25) रोजी पहाटे  पाचच्या सुमारास घडली.

जीकठाण प्राथमिक आरोग्य केंद्राची सरकारी रुग्णावाहिका 102 मध्ये चालक रवींद्र रावसाहेब गोरे हा भेंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित महिलांचे लेप्रोस्कोपी कुटुंबकल्याण ऑपरेशन कॅम्पच्‍या महिलांना घेऊन घरी जात होता. त्यादरम्यान काही रूग्‍ण रहीमपूर येथे सोडायचे असल्‍याने गोरे हा जिकठाण फाट्यावरून वळण घेत होता. त्‍याचवेळी पाठीमागून भरधाव आलेली खाजगी ट्रॅव्हल्सची बस (रसिका कोंडुसकर) (एमएच09, बीसी -9540) ने अम्‍ब्‍युलन्‍स102 ( एमएच 20- डब्यु-9573)ला पाठीमागून जोराची धडक दिली. 

बुधवारी (ता.25) रोजी पहाटे पाचच्या सुमारास झालेल्‍या या भीषण अपघातात रुग्णावाहिकेतील जानकाबाई जनार्धन पवार (60), ताराबाई ज्ञानेश्वर बहादुरे(50) जानाबाई बाळकृष्ण थोरात (50), लक्ष्मीबाई बंडु बोडखे(45), अनिता संतोष वायसळ (30),मनिषा सखाराम सावंत (28), जनाबाई लक्ष्मण बाराहाते (26), वैशाली गोकुळ बोडखे (26), अनिता संतोष घोडके (20), कविता आत्माराम थोरात (28), अनिता बारसले (24) व प्रसाद आत्माराम थोरात आदी जखमी झाले. 

या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस हेडकॉस्‍टेबल दत्तात्रय साठे व भाले यांनी घटनास्थळी धाव घेत त्वरीत जिकठाण व वाळूज एमआयडीसी येथील 108 सरकारी रुग्णवाहिकेचे डॉ. मोहनीराज दारकोंडेख पायलट राजू रोकडे यांच्‍या मदतीने घाटीत उपचारार्थ दाखल केले असता जानकाबाई जनार्धन पवार (60),रा दिघी, ता गंगापुर व ताराबाई ज्ञानेश्वर बहादुरे (50) रा.लहान्याची वाडी ता. फुलंब्री यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्‍य सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. 

Web Title: Aurangabad Waluj Road Accident 2 Women Died 10 Injury