Aurangabad : पांढऱ्या सोन्याचे यंदा तीस टक्केच उत्पन्न; शेतकरी वर्गात चिंता

जिनिंग व्यवसाय डबघाईला : वैजापूर तालुक्याला पावसाअभावी बसला सत्तर टक्के फटका
कापूस
कापूसe sakal

वैजापूर : तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कापूस उत्पादनात तब्बल सत्तर टक्के फटका बसला आहे. याचा थेट परिणाम जिनिंग प्रेसिंग व्यवसायावर झाल्याचे बघायला मिळत आहे. गेल्यावर्षी तालुक्यात ९ जिनिंग मिल सुरू होत्या. यंदा मात्र, केवळ ३ ठिकाणी मिल सुरु झाल्या असून .त्यामुळे ६५ हजार गाठींचे उत्पादन आता १० ते १५ हजारच गाठींवर आल्याचे चित्र तालुक्यातील जिनिंग व्यावसायिकांवर आहे.

कापूस
Winter Fashion Tips : हिवाळ्यात दिसायचे आहे कूल? मग, ‘या’ सोप्या टीप्सच्या मदतीने मिळवा स्टायलिश लूक

यावर्षी तालुक्यातील १२ पैकी १२ महसूल मंडळात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने ऑक्‍टोबर महिन्यात सर्वच धरणात शून्य टक्के पाणी साठा आहे. यंदा नद्या, नाले दुथडी भरूनही वाहताना दिसले नाही. यामुळे दोन वेचनीत कापूस पिकांचे उत्पादन संपुष्टात आले. दरम्यान, खरीप हंगामात शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसला आता कापूस खरेदीचे बाजारभाव कमी जास्त होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. गेल्या आठवड्यात ७ हजार ५०० रुपये क्विंटल विकणारा कापूस व्यपारी आता ७ हजार रुपये क्विंटलने खरेदी करत आहे.

कापूस
Career Tips : करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे; ठेवा सकारात्मक दृष्टिकोन

तर जिनिंगवर ७ हजार २०० रुपये क्विंटलने खरेदी सुरु आहे. सुरवातीला साढेपाच हजाराने कापसाला बाजार भाव मिळत होता. विशेष म्हणजे यंदा शेतकऱ्यांकडे जास्त कापून नाही. ज्या शेतकऱ्यांकडे आहे ते बाजारात आणखी चांगला भाव येईल, या आशेमुळे कापूस विक्री करीत नसल्याचे चित्र आहे. सध्या गरजू शेतकरीच तुरळक कापूस विक्रीस आणत आहे.

कापूस
Career Tips : करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे; ठेवा सकारात्मक दृष्टिकोन

आतापर्यंत तीनच जिनिंग मिल सुरू

तालुक्यात गेल्यावर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे ९ जिनिंग मिल सुरु होते. त्यामुळे ६५ हजार गाठींचे उत्पादन झाल्याने तब्बल पंधराशे कोटींची उलाढाल केवळ जिनिंग मिलवर झाली होती. यंदा, मात्र कापूसचे उत्पादन ७० टक्केने घटल्याने तालुक्यात आतापर्यंत ९ पैकी केवळ ३ ठिकाणी जिनिंग मिल सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे करोडो रुपयांचा फटका जिनिंग व्यवसाय करणाऱ्यांसह कामगाराला बसला आहे.

कापूस उत्पादन घटल्याने वैजापुरातील जिनिंग, प्रेसिंग व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यंदा केवळ १५ ते २० हजार गाठींचे उत्पादन होईल असा विश्‍वास आहे.

—शांतिलाल पहाडे, अध्यक्ष, पहाडे जिनिंग प्रेसिंग, वैजापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com