औरंगाबादच्या तरुणाला कर्मवीर चक्र

Harshavardhan Shahi
Harshavardhan Shahi

औरंगाबाद : नव्या युगाचा कानमंत्र असणाऱ्या इंटरनेटचा, वेळ घालवण्यासाठी उपयोग न करता, त्यातून भवितव्य घडवणाऱ्या औरंगाबादच्या हर्षवर्धन शाही या युवकाचा आयआयटी दिल्ली इथे प्रतिष्ठीत 'ग्लोबल यंग लीडर फेलोशीप' आणि 'कर्मवीर चक्र' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

ICONGO अर्थात इंडिअन कॉन्फेडरेशन ऑफ एनजीओज आणि संयुक्त राष्ट्रे (युनो) यांच्यातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात अग्रदूत ठरणारा आणि मराठवाड्यात इंटरनेट ब्लॉग्ज, रिव्ह्यूजची मुहूर्तमेढ रोवणारा हर्षवर्धन याआधीही अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

औरंगाबाद फूड एक्स्प्लोरर या इन्स्टाग्राम ग्रुपच्या माध्यमातून शहरातील हॉटेल्स, कॅफेज, रेस्टोरंटस किंवा खाण्यापिण्याशी संबंधित कोणत्याही व्यवसायाची जाहिरात, हे त्याचे उत्पन्नाचे साधनही आहे. ग्लोबल यंग लीडर फेलोशीप आणि कर्मवीर चक्र पुरस्कारासाठी त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com