Maratha Reservation Survey : कन्नड तालुक्यात १०० टक्के सर्वेक्षण ; शहरासह तालुक्‍यात सातशे कर्मचाऱ्यांनी राबविली मोहीम

कन्नड तालुक्यातील सर्व कुटुंबीयांचे सामाजिक आर्थिक मागासलेपणाचे सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिली.
kannad
kannadsakal

कन्नड : कन्नड तालुक्यातील सर्व कुटुंबीयांचे सामाजिक आर्थिक मागासलेपणाचे सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिली.

शासनाच्या आदेशानुसार, सुरुवातीला मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर अमागास समाज घटकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश आले. त्यानंतर पूर्ण समाज घटकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आले. प्रत्येक वेळेस सर्वेक्षण करणाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाचे शिवधनुष्य मेहनती मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाची क्रांती यामुळे पूर्ण होऊ शकले, असे तहसीलदार कडवकर म्हणाले.

२३ डिसेंबर ते २ फेब्रुवारी यादरम्यान कन्नड तालुक्यातील चार लाख जनतेचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले‌. हे सर्वेक्षण ७०० कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण झाले. साधारणतः दीडशे प्रश्न भरून घेण्यात आले.

यासाठी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, नायब तहसीलदार मोनाली सोनवणे, दिनेश राजपूत, गटशिक्षणाधिकारी वेरूळकर, सीडीपीओ राठोड आदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यासाठी शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील यांसोबतच पंधरा प्रगणक तैनात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com