SSC Exam : दहावीची पोरं हुश्शार... इंग्रजीचा पेपर गेला सोपा

दहावीचा एक मार्चला मराठीचा पेपर झाल्यानंतर गुरुवारी इंग्रजीचा पेपर घेण्यात आला. इंग्रजीचा पेपर सोप्पा गेल्याच्या प्रतिक्रिया बहुतांश विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिल्या.
SSC Exam
SSC ExamSakal

छत्रपती संभाजीनगर : दहावीचा एक मार्चला मराठीचा पेपर झाल्यानंतर गुरुवारी इंग्रजीचा पेपर घेण्यात आला. इंग्रजीचा पेपर सोप्पा गेल्याच्या प्रतिक्रिया बहुतांश विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिल्या.

विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी १ लाख ८६ हजार ८१४ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. एक मार्चला मराठीचा पेपर झाला होता. मराठी विषयाचा पेपर सोपा होता. त्यावेळी विभागात दहावीच्या परीक्षेला एकही गैरप्रकार आढळून आला नव्हता.

त्यानंतर गुरुवारी (ता.सात) इंग्रजीचा पेपर झाला. इंग्रजीचा पेपरही अत्यंत सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगीतले. शिक्षण विभागातर्फे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक तत्वावर चार सराव समृद्धी चाचण्या घेतल्या होत्या. त्याचा सकारात्मक परीणाम असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

विभागात २६ कॉपी केसेस

दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला कॉपी करताना विभागात २६ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे. यात परभणी जिल्ह्यात २१ आणि हिंगोलीत ५ केसेस दाखल झाल्या आहेत, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी दिली.

इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी होती. सर्व प्रश्न सोडवले. शाळेत आमच्याकडून सर्व प्रश्नांचा सराव करुन घेतला होता. त्यात पत्र लेखन, अनसिन पॅसेज, न्यूज रायटींग, स्पिच रायटींग, स्टोरी रायटींग, डायलॉग रायटींग, भाषांतर, लॅग्वेज स्टडी असे सर्व जास्त मार्काचे प्रश्न अनेकवेळा सोडवून घेतले होते. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोपी गेली.

— यश सोनवणे, विद्यार्थी

यंदा शिक्षण विभागातर्फे सराव समृद्धी चाचणी सोडवून घेण्यात आल्या होत्या. त्यावेळीच परीक्षेची तयारी झाली होती. पेपर कसा लिहायचा हे कळाले होते. वेळेचे नियोजन करुन वेळेत पेपर सोडवला. प्रश्नपत्रिकेत विचारलेले सर्व प्रश्न सोपे होते.

— अजय कदम, विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com