

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीच्या निकालासाठी काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यंदा निकाल १५ मेपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. गतवर्षी २१ मे रोजी निकाल जाहीर झाला होता. यंदा उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन लवकर पूर्ण झाल्याने निकाल वेळेआधी लागण्याची शक्यता असून, यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये उत्सुकता आहे.