Sambhaji Nagar News : संभाजीनगर शहरात वाचली १५ हजार झाडे

सोलार पॅनलने रोखले तब्बल २५८ टन कार्बनचे उत्सर्जन
sambhaji nagar
sambhaji nagar Sakal

छत्रपती संभाजीनगर: स्मार्ट सिटीच्या कार्यालयावर बसविण्यात आलेल्या दोनशे किलो वॅट क्षमतेच्या सोलार पॅनलमुळे रोज सातशे युनिट वीज निर्मिती होत आहे. दोन वर्षांत तब्बल अडीच लाख किलो वॅट विजेची निर्मिती झाली आहे. स्मार्ट सिटी कार्यालयाचे पूर्वी दरमहा ७ लाख रुपये वीज बिल येत होते, त्यात पाच लाख रुपयांची बचत होत आहे. या प्रकल्पामुळे २५८ टन कार्बनडायऑक्साइड उत्सर्जन रोखल्या गेले असून, सुमारे १४,२३८ झाडांचे प्राण वाचले आहेत, असा दावा मंगळवारी (ता. १६) स्मार्ट सिटीने केला.

आमखास मैदानाशेजारी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयावर एक कोटी २० लाख रुपये खर्चून येथे २०० किलो वॅट क्षमतेचे सोलार पॅनल बसविण्यात आले आहे.

त्यातून रोज सातशे युनिट वीज निर्मिती होत आहे. या विजेचा वापर कमांड सेंटर केला जात आहे. यापूर्वी स्मार्ट सिटी कार्यालयाचे महिन्याचे सरासरी बिल हे सहा ते सात लाख रुपये एवढे येत होते. सोलार प्रकल्पामुळे वीज बिलात ७५ टक्के बचत होत असून, दरमहा तयार होणारी वीज महावितरणला विक्री केली जात आहे.

या प्रकल्पातून आतापर्यंत जेवढी वीज निर्मिती झाली आहे, तेवढी वीज तयार करण्यासाठी २५८.१ टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन झाले असते. त्यासाठी १०३.६ टन कोळसा लागला असता. या सोलार प्रकल्पातून स्मार्ट सिटीने कार्बन क्रेडिटदेखील कमावले आहे.

महापालिका राबविणार प्रकल्प

स्मार्ट सिटी कार्यालयावर कार्यान्वित करण्यात आलेल्या सोलार प्रकल्पामुळे महापालिकेनेही प्रेरणा घेतली आहे. त्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी, फारोळा तसेच सिद्धार्थ उद्यानात सोलार प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीवरसुद्धा अशाच प्रकारचे पॅनल लावण्यात आली आहेत. त्यामुळे वीज बचत होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com