अमृत २.० योजनेअंतर्गत नवीन पाणीपुरवठ्यासाठी १८५ कोटी रूपये मंजुर - ज्ञानराज चौगुले

उमरगा शहरासाठी कार्यरत असलेल्या माकणी धरणातुन होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत येणाऱ्या अडथळ्यामुळे पाणीटंचाईची समस्या कायम होती.
अमृत २.० योजनेअंतर्गत नवीन पाणीपुरवठ्यासाठी १८५ कोटी रूपये मंजुर
अमृत २.० योजनेअंतर्गत नवीन पाणीपुरवठ्यासाठी १८५ कोटी रूपये मंजुरSakal

उमरगा : उमरगा शहरासाठी कार्यरत असलेल्या माकणी धरणातुन होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत येणाऱ्या अडथळ्यामुळे पाणीटंचाईची समस्या कायम होती. शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मंजूरीसाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने शुक्रवारी (ता. १५) योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अटल २.० अमृत अभियान अंतर्गत उमरगा शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पासाठी सुमारे १८५ कोटी रुपयांचा निधी झाला आहे. यामध्ये प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के हिस्सा केंद्र शासन, ४५ टक्के हिस्सा राज्य शासन व पाच टक्के हिस्सा नगर परिषद भरणार आहे.

या निधीतून माकणी ते उमरगा नव्याने जलवाहिनी व शहरात अंतर्गत नवीन जलवाहिनीचे कामे होणार आहेत. यामुळे उमरगा शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असुन भविष्यात उमरगेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही.

उमरगा शहरातील हद्दवाढ भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. या कामासाठी निधी मंजुर केल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री तानाजी सावंत तसेच सदरकामी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांचे आभार मानले आहेत.

पाणीटंचाई होणार दुर !

उमरगा शहरात सध्या पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा धरणातुन कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना आहे मात्र योजनेतील जलवाहिनीच्या फुटीची समस्या नेहमी असते परिणामी पाणी पुरवठ्यात विस्कळीतपणा येतो आहे.

शहरवासियांची ही समस्या सोडवण्यासाठी आमदार चौगुले यांनी कायमस्वरुपी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मंजूरीसाठी सातत्याने पाठपुरवठा केल्याने १८५ कोटी खर्चाच्या योजनेला प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. ही योजना कार्यरत झाल्यास शहरवासियांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com