Ram Mandir : संभाजीनगरात श्री रामाची २३ मंदिरे; रामायणातील दंडकारण्यात मराठवाड्याचा उल्लेख

मराठवाड्यातचे महत्त्वाचे शहर आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात प्रभू श्रीरामांची एक दोन नव्हे तर तब्बल २३ मंदिरे आहेत.
23 ram mandir in chhatrapati sambhajinagar ramayan significance
23 ram mandir in chhatrapati sambhajinagar ramayan significanceSakal

छत्रपती संभाजीनगर : रामायणकाळातील दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात असलेला मराठवाडा. मराठवाड्यातचे महत्त्वाचे शहर आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात प्रभू श्रीरामांची एक दोन नव्हे तर तब्बल २३ मंदिरे आहेत.

यापैकी सर्वांत पुरातन हर्सूल आणि जसवंतपुरा येथील मंदिरे आहेत. जसवंतपुरा येथील या राम मंदिराला ३५९ वर्षांचा इतिहास आहे तर सर्वांत अलीकडचे म्हणजे चार महिन्यांपूर्वी झालेले पन्नालालनगरातील सेंच्युरी प्राइडमधील राम मंदिर आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात जसवंतपुरा (किराडपुरा) येथील सर्वांत पुरातन राम मंदिर आहे. यापैकी चौराहा भागातील पूर्वीचे मोठे मंदिर आता मोठ्या इमारती वाढल्याने छोटे झाले आहे. टिळक पथाजवळील राम मंदिर.

श्रीमान श्रीमती कापड दुकानाच्या पलीकडच्या गल्लीत एका वाड्यात तीनशे वर्ष जुने मंदिर आहे. जय विश्वभारती कॉलनीतील राम मंदिर, राजनगरातील राम मंदिर पोद्दार शाळेच्या मागे राजनगरातील या मंदिराचे दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले मंदिर आहे.

बसस्थानक ते रेल्वस्टेशन रोडवर पदमपुऱ्यात तुलसी भवन येथे राम मंदिर आहे. कैलासनगरात ४० वर्ष जुने राम मंदिर आहे. वरद गणेश मंदिराच्या मागे असलेले समर्थनगरातील समर्थ राम मंदिर, सातारा परिसरातील श्रीराम भक्त हनुमान मंदिर व प्रल्हाद महाराज उपसाना केंद्राचे राम मंदिर,

पडेगावातील मीरानगरातील राम मंदिर, हर्सूल येथे हरसिद्धी देवी मंदिरासमोरील राम मंदिर जे अतिशय प्राचीन व दुर्लक्षित आहे. काहींच्या मते १५५०-१६२० काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे सांगण्यात येते.

इटखेडा येथील राम मंदिर, सिडको एन-४ मधील राम मंदिर, बजाजनगर, दीपनगर हडको, रांजणगावात प्रभू रामाची मंदिरे असल्याचे शहरातील राम मंदिरांची माहिती संकलित करणारे प्रा. डॉ. अनिल मुंगीकर यांनी सांगितले.

तीन वर्षे केली माहिती संकलित

डॉ. बाबासाहेब आबंडेकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातून निवृत्त झालेले प्रा. डॉ. अनिल मुंगीकर यांनी निवृत्तीनंतर २०१८ पासून तीन वर्ष जिथे माहिती मिळेल तिथे जाऊन मंदिरांविषयीची माहिती घेऊन ती संकलित केली. ते म्हणाले, ‘‘गूगल मॅपवर मंदिर अशी खूण दर्शवली की तिथे जाऊन माहिती घेत गेलो आणि शहरातील जवळपास १ हजार मंदिरांविषयीची माहिती मिळाली, या माहितीचे संकलन केले आहे.

घरात धार्मिक वातावरण असल्याने लहानपणापासून धार्मिक गोष्टींविषयी आस्था असल्याने ही माहिती गोळा केली. आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर ती इतरांना सांगावी या भावनेतून सचित्र रूपाने संकलित करून मंदिरांविषयीच्या माहितीचे दहा खंड तयार केले.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com