लॉकडाउनमध्ये निघाले २६ टक्के पॉझिटिव्ह! सरासरीनुसार रोज ३०३ बाधित 

File Photo
File Photo

औरंगाबाद ः मुंबई, ठाणे, पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर औरंगाबादेतील प्रादुर्भावाची चिंता मराठवाड्याला लागली आहे. सर्वांचे लक्ष जिल्ह्यातील नऊ दिवसांच्या लॉकडाउनवर होते.

या कालावधीत दोन हजार ७३२ जण बाधित झाले. हे आकडे निश्‍चितच डोळ्यात अंजन घालणारे आहेत. एकूण बाधितांपैकी २६.२५ टक्के पॉझिटिव्ह या काळातच निघाले आहेत. 

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने नऊ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला. या कालावधीत टेस्टचे प्रमाण वाढविण्यात आले. त्यामुळेच जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एवढी बाहेर आली. 

मात्र याचा दुसरा अर्थ असा, की औरंगाबादेत आता समूहात संसर्ग होत असल्याचीच शक्यता जास्त आहे. एकूण कोरोनाबाधितांमध्ये २६ टक्के बाधित नऊ दिवसांतच समोर आले आहेत. 

नऊ दिवसांतील रिकव्हरी रेट ६६.७६ टक्के 
नऊ जुलैपूर्वी रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याची टक्केवारी) ५४.२४ टक्के होता. त्यातही रुग्ण वाढतच गेले आणि उपचाराची निरंतर प्रक्रिया सुरूच असल्याने हाच रिकव्हरी रेट ५७.५३ एवढा झाला आहे. या काळात एकूण दोन हजार ७३२ बाधित झाले, तर याच काळात डॉक्टरांनी एक हजार २४ रुग्णांना बरे केले. या काळातील रिकव्हरी रेट ६६.७६ टक्के एवढा होता. 

 हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....
 
मृत्युदर ०.६४ टक्क्यांनी घटला 
जिल्ह्यात नऊ जुलैपर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी मृत्युदर ४.४० टक्के होता. आज १८ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ३९२ जणांचा मृत्यू झाला. आता ३.७६ एवढा झाला. अर्थात ०.६४ ने मृत्युदर घटला आहे. 
  
नऊ दिवसांतील मृत्युदर १.९७ टक्के  
लॉकडाउनच्या काळातील मृत्युदर अत्यंत कमी झाला. ही चांगली बाब आहे. निष्काळजीपणा मृत्युदर वाढविण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळेच मृत्युदर वाढू नये यासाठी प्रशासनातील सर्वांनाच अत्यंत आवश्‍यक उपाय तातडीने अमलात आणून अंमलबजावणीत सातत्य यायला हवे. 

आकडे  9 जुलै 18 जुलै  फरक 
एकूण बाधित ७६७२   १०४०४ २७३२ बाधित 
एकूण मृत्यू ३३८  ३९२ ५४ मृत्यू 
रिकव्हर झालेले ४१६२   ५९८६ १८२४ जण बरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com