
लॉकडाऊनमुळे आपण घरात कैद झाल्यासारखी स्थिती आहे. प्रत्येकाची जीवनशैली बदलून गेलीय, ती राब राब राबते, घरातल्या सर्वांसाठी धाव धाव धावते. पण तरीही घरातलं साध वातावरणही बदललं तरी तिच्या हार्मोन्सवर परिणाम होतो, याचे मात्र कुणाला देणेघेणे राहत नाही.
Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?
औरंगाबाद: लॉकडाऊनमुळे आपण घरात कैद झाल्यासारखी स्थिती आहे. प्रत्येकाची जीवनशैली बदलून गेलीय, ती राब राब राबते, घरातल्या सर्वांसाठी धाव धाव धावते. पण तरीही घरातलं साध वातावरणही बदललं तरी तिच्या हार्मोन्सवर परिणाम होतो, याचे मात्र कुणाला देणेघेणे राहत नाही.
प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रेरणा देवधर यांच्या मते, लॉकडाऊन काही अंशी उठवण्यात आले असले तरीही प्रत्येकाच्या व्यायामाच्या वेळा बदलल्या आहेत. झोपण्याच्या, खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या आहेत, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे टेन्शन येणे, मोबाईलचा वाढता वापर, टीव्ही पाहण्याचेही प्रमाण वाढलेले यामुळे घरात वादावादीही होत असल्याच्या काही केसेस आल्या आहेत.
हेही वाचा- बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम
यामध्ये ‘ती घरातल्या सर्वांच्या मनासारखं करते’ तरीही तिच्यावर ओरडण्यासारखे प्रकार सुरु आहेत. एकंदरीत या सगळ्यात तिचं स्वास्थ्य टिकून राहत नाही, परिणामी मासिक पाळीतही अनियमितता येते त्यामुळे आपल्या घरातल्या ‘ती’ची काळजी घेणे हे कर्तव्यच असल्याची भावना डॉ. देवधर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
लॉकडाऊनमूळे आपली दिनचर्या बदलली आहे. स्थूलपणा वाढतो आहे, धावण्याच्या व्यायामावर जोर द्या. याने शरीरात ऊर्जा राहते, आणि नैराश्य घालविण्यास मदत होते. एन्झायटी वाढू देऊ नका, आजवर राहून गेलेले आपले छंद जोपासा. ब्लड प्रेशर वाढू देऊ नका, वजन वाढू देऊ नका, आपल्याला काम होईल का, आता कोरोना कधी कमी होईल याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्याऐवजी स्वतःची काळजी घ्या असेही डॉ. देवधर म्हणाल्या.
हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत
हेल्दी फंक्शनिंगसाठी तिला द्या साथ
डॉ. देवधर यांच्या मते, अनेकवेळा महिला तणावाखाली असतील तेव्हा, मासिक पाळी अनियमितपणे होते. अशावेळी रक्तस्त्राव जास्त होणे, वेळेच्या वेळी न होणे यासारख्या गोष्टी होतात. वजन वाढलं ही मासिक पाळी कंट्रोल करणारे हार्मोन्स असतात, त्यामध्ये बदल व्हायला सुरवात होते, काही ठराविक हार्मोन्स वाढतात तर काही कमी होतात,
यामुळे नियमित पाळी येत नाही, अन रक्तस्त्राव जास्त होतो. प्रामूख्याने पाळी नियमितपणे आली नाही तर स्थूलपणा वाढतो, रक्तस्त्राव जास्त झाला तर अनिमिया हिमोग्लोबीन कमी होतो. त्यामुळे घरातल्या ‘ती’ ला हेल्दी फंक्शनिंगसाठी तिच्या आवडीनिवडीच्या गोष्टी कराव्यात, असा सल्ला डॉ. देवधर यांनी दिला.
हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार