Air Quality : हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी बसविणार ३० यंत्रे; ‘गुगल’च्या सहकार्याने भुवनेश्वरच्या कंपनीसोबत महापालिकेचा करार

शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू
30 machines will installed to measure air quality municipal corporation agreement with Bhubaneswar company collaboration with Google
30 machines will installed to measure air quality municipal corporation agreement with Bhubaneswar company collaboration with GoogleSakal

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनातर्फे दरवर्षी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. त्यातून शहरात व्हर्टिकल गार्डन, कारंजे सुरू करण्यात आले आहेत.

त्यात आता महापालिकेने हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी खासगी एजन्सी व गुगलसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. चार) भुवनेश्वर येथील ''ऑराशुअर'' कंपनीसोबत प्रशासक जी. श्रीकांत यांनी करार केला. कंपनीतर्फे ३० ठिकाणी यंत्रे बसविली जाणार आहेत.

शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर आधारित सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे. त्यामाध्यमातून मिळालेल्या डेटाच्या आधारे शहरातील हवेचे प्रदूषण कमी केले जाईल.

30 machines will installed to measure air quality municipal corporation agreement with Bhubaneswar company collaboration with Google
Google Alert : गुगलची मोठी सेवा होणार बंद, यूजर्सना दिला अलर्ट! तुम्हाला मिळाला का ई-मेल?

यासंदर्भात मंगळवारी करार करण्यात आला. यावेळी ऑराशुअर कंपनीच्या सीईओ आकांक्षा प्रियदर्शिनी यांनी सांगितले की, शहरात हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी असलेली यंत्रणा जुनी आहे. त्यामुळे ३० सेन्सर-आधारित एअर मॉनिटरिंग उपकरणे शहरात लावली जाणार आहेत.

त्याचा खर्च खर्च गुगलतर्फे केला जाणार आहे. २५ उपकरणे वायू प्रदूषणाच्या हॉटस्पॉट्सवर बसविण्यात येतील तर पाच स्मार्ट सिटी बसवर बसविले जातील. यासंदर्भात स्मार्ट सिटीचे फैज अली यांनी सांगितले की,

30 machines will installed to measure air quality municipal corporation agreement with Bhubaneswar company collaboration with Google
Chhatrapati Sambhaji Nagar : घरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी असलेल्या खांबावर हे यंत्र बसवले जातील, त्यातून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये केले जाईल.

शाळा, महाविद्यालय परिसरात असतील यंत्र

शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, निवासी भाग, बाजारपेठ, वाहतूक जंक्शन व सार्वजनिक बसवर हे सेन्सर बसवले जातील. सेन्सर्सद्वारे मिळालेला डेटा प्रदूषण कमी करण्यासाठी वापरला जाणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी कार्यरत पर्यावरण तज्ज्ञ सय्यद आसिफ अली यांनी सांगितले की, एआयवर आधारित सेन्सर हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com