
जगभरात गुगलच्या अनेक सेवांचे अब्जावधी वापरकर्ते आहेत. तुम्हीदेखील गुगलच्या सेवा वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गुगल आपली एक मोठी सेवा बंद करणार आहे. याबाबत गुगल स्वतः ई-मेल करून आपल्या यूजर्सना अलर्ट करतंय.
गुगल आपली अब्लम अर्काइव्ह ही सेवा येत्या काही काळात बंद करणार आहे. यामुळेच, आपल्या डेटाचा बॅकअप घेण्यासंबंधी इशारा देणारा ई-मेल कंपनी आपल्या यूजर्सना करत आहे. जर तुम्हाला असा मेल अद्याप मिळाला नसला, तर भविष्यात तो मिळू शकतो. मात्र, त्यापूर्वीच तुम्ही योग्य ती खबरदारी घेऊ शकता.
कधी होणार बंद?
गुगलने दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै २०२३ पासून अल्बम अर्काइव्ह ही सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळेच लवकरात लवकर आपल्या डेटाचा बॅकअप घेण्याचे आवाहन गुगलमार्फत करण्यात येत आहे.
कसा कराल बॅकअप?
यासाठी तुम्हाला गुगल अल्बममधील डेटा डाऊनलोड करून घ्यावा लागेल. यासाठी कंपनीने एक लिंक शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला अब्लम अर्काइव्ह डेटा डाऊनलोड करू शकता.
सपोर्ट पेजवर सुविधा
ज्या यूजर्सना गुगलचा मेल अद्याप मिळाला नाही, ते लोक गुगलच्या सपोर्ट पेजवर जाऊनही आपला डेटा डाऊनलोड करू शकतात. गुगलच्या या सपोर्ट पेजवर (https://support.google.com/picasa/answer/7008270?hl=en) गेल्यानंतर तुम्हाला डाऊनलोडिंग लिंक दिसेल, यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपला डेटा सेव्ह करू शकाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.