esakal | Big News : औरंगाबाद हादरले!, एकाच दिवशी २९ पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

30 new patients of Kovid 19 in Aurangabad

एकाच दिवशी तब्बल २९ नवे रुग्णे आढळले असून, एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे शहर हादरले असून, आरोग्य विभाग अधिक सर्तक झाला आहे.

Big News : औरंगाबाद हादरले!, एकाच दिवशी २९ पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद  ः कोरोना विषाणू आणि त्यापासून होणाऱ्या कोविड-१९ या आजाराचा धोका शहरात वाढत आहे. शहरात आज (ता. २७) एकाच दिवशी तब्बल २९ नवे रुग्णे आढळले असून, एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे शहर हादरले असून, आरोग्य विभाग अधिक सर्तक झाला आहे.

शहरात १५ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. परदेशातून आलेल्या एका महिलेला संसर्ग झाला. त्यानंतर तब्बल १५ दिवस शहरात नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता; पण दोन एप्रिलला एन- चारमधील एका महिलेला बाधा झाली आणि त्यानंतर आजपर्यंत (ता. २७) तब्बल ८३ व्यक्ती कोरोनाग्रस्त झाल्या. 
 
एका महिलेचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी (ता. २५) दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा सोमवारी (ता. २७) दुपारी साडेबारा वाजता
उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे. लेफ्ट साईडेड न्यूमोनायटिस विथ डायबेटिस विथ हायपरटेंशन विथ हायपोथायरॉडीझम या आजारामुळे किलेअर्क भागातील ६० वर्षीय महिलेला २४ एप्रिलला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ एप्रिलला या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. तसेच त्याच दिवशी त्यांचा कोवीड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनासोबतच मधुमेह, रक्तदाब आदी आजार असल्याने या वृद्धेची प्रकृती चिंताजनक बनली होती. 

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा


या भागात आज सापडले नवे रुग्ण

 • टॉउन हॉल, नूर कॉलनी - १२
 • काळा दरवाजा - १
 • किलेअर्क - १३
 • आसेफिया कॉलनी - २
 • भावसिंगपुरा - १
 • एकूण - ३० 

 
असे वाढले कोरोना रुग्ण 

 • १५ मार्च : १ 
 • २ एप्रिल : २ 
 • ५ एप्रिल : ७ 
 • ६ एप्रिल : १ 
 • ७ एप्रिल : ३ 
 • ८ एप्रिल : ३ 
 • ९ एप्रिल : १ 
 • १० एप्रिल : २ 
 • १३ एप्रिल : ४ 
 • १४ एप्रिल : १ 
 • १६ एप्रिल : ३ 
 • १७ एप्रिल : १ 
 • १९ एप्रिल : १ 
 • २० एप्रिल : १ 
 • २१ एप्रिल : ५ 
 • २२ एप्रिल : २ 
 • २३ एप्रिल : २ 
 • २४ एप्रिल : ४ 
 • २५ एप्रिल : ५ 
 • २६ एप्रिल : ४
 • २७ एप्रिल : २९  
 • एकूण : ८३ 

  
आतापर्यंत झालेले मृत्यू 

 • ५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू 
 •  १४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू 
 • १८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू 
 •  २१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू 
 • २२ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू 
 • २७ एप्रिलला किलेअर्क भागातील ६० वर्षीय महिलेला मृत्यू

 
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 

 • २३ मार्च - १ 
 •  १५ एप्रिल - १ 
 • १८ एप्रिल - १ 
 • १९ एप्रिल - ५ 
 • २० एप्रिल - ७ 
 • २२ एप्रिल -  १ 
 • २४ एप्रिल - ६ 
 • एकूण - २२ 
loading image