छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळांत ३६३ नवे गुरुजी; आज देणार समुपदेशनाद्वारे पदस्थापना

पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरती झाली. यात जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेल्या ३६३ भावी शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी (ता. १३) समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळांत ३६३ नवे गुरुजी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळांत ३६३ नवे गुरुजीSakal

छत्रपती संभाजीनगर : पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरती झाली. यात जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेल्या ३६३ भावी शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी (ता. १३) समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात येणार आहे.

समुपदेशनाची प्रक्रिया दिवसभर चालणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सेवेत नव्याने रुजू होणारे शिक्षक आणि प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे राज्यभरातील जिल्हा परिषदांसाठी रिक्त जागांनुसार शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्र ठरलेले आहेत. त्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मराठी माध्यमांसाठी ३७०; तर उर्दू माध्यमासाठी ३८ अशा एकूण ४०८ शिक्षकांची निवड करण्यात आली होती.

या नव्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी ४ ते ६ मार्चदरम्यान करण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमाचे ३३३; तर उर्दू माध्यमासाठी ३० असे ३६३ शिक्षक पात्र ठरले. या शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेच्या वेरुळ सभागृहात सकाळी १० वाजता संबंधित उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह बोलविण्यात आले. त्यामुळे आता ज्या शाळांमध्ये पदे रिक्त आहेत त्या शाळांना शिक्षक मिळणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांनी दिली.

कोणत्या विषयांसाठी किती शिक्षक?

नव्याने शिक्षक भरतीत जिल्ह्यासाठी पात्र ठरलेल्या ३६३ नव्या उमेदवारांना समुपदेशनाद्वारे शाळा व पदस्थापना मिळणार आहे. यामध्ये मराठी विषयासाठी १०१, इंग्रजी २८, गणित-विज्ञान १५८, भाषा ४६ असे ३३३; तर उर्दू माध्यमासाठी उर्दूसाठी ३० अशा अशा एकूण ३६३ शिक्षकांना याच दिवशी नोकरीचे आदेश मिळणार आहेत.

गैरहजर उमेदवारांची संधी हुकणार

जिल्हा परिषदेच्या वेरुळ सभागृहात होणाऱ्या समुपदेशन प्रक्रियेत भावी शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी निवड झालेले उमेदवार गैरहजर राहिल्यास नंतर त्यांचा विचार करण्यात येणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com