औरंगाबाद महापालिकेतही शिवसेनेला मोठा झटका; 4 नगरसेवक शिंदे गटात, आणखी 12 जण फुटण्याची शक्यता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Municipal Corporation

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत.

औरंगाबाद महापालिकेतही शिवसेनेला मोठा झटका; 4 नगरसेवक शिंदे गटात

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळं महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झालाय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. औरंगाबाद शिवसेनेचे 4 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळं आता औरंगाबाद महापालिकेतही (Aurangabad Municipal Corporation) शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय.

हेही वाचा: कठीण काळात स्वत:च्या रक्तानं पत्र लिहून शिवसैनिकानं दिला उद्धव ठाकरेंना पाठिंबा

शिवसेनेचे 4 नगरसेवक नुकतेच शिंदे गटात दाखल आहेत, तर आणखी 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजेंद्र जंजाळ, सिद्धांत शिरसाठ, वर्षाराणी वाडकर आणि विकास जैन आदी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. 29 पैकी चार नगरसेवक उघडपणे शिंदे गटात दाखल असून येत्या काळात आणखी 10 ते 12 नगरसेवक फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळं शिवसेनेसाठी हा मोठा धक्काच म्हणावा लागेल.

हेही वाचा: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमदारांना दिली लाच; काँग्रेसची मुर्मू यांच्याविरुध्द तक्रार

शिवसेनेचा धोका वाढतोय?

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काही माजी नगरसेवकही शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यासाठी प्रामुख्यानं औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघात मोटबांधणीचं काम सुरुय. शिंदे गटाकडून इच्छुकांकडून फॉर्मही भरून घेतले असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी तसे अर्ज भरून दिले आहेत. येत्या आठवडाभरात चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिलीय.

Web Title: 4 Corporators Of Shiv Sena In Aurangabad Municipal Corporation Joined Shinde Group

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..