याला म्हणतात निष्ठा! कठीण काळात स्वत:च्या रक्तानं पत्र लिहून शिवसैनिकानं दिला उद्धव ठाकरेंना पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Shivsena

शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर नेत्यांच्या कोलांटउड्या इकडून-तिकडं सुरु आहेत.

कठीण काळात स्वत:च्या रक्तानं पत्र लिहून शिवसैनिकानं दिला उद्धव ठाकरेंना पाठिंबा

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळं मातोश्रीवर संकट ओढावलं असताना काही शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पाठिशी ठामपणे उभे आहेत. टोप (ता. हातकंगले) येथील सूरज विलास पाटील (Suraj Vilas Patil) या शिवसैनिकानं (Shiv Sainik) स्वत:च्या रक्तानं पत्र लिहून उद्धव ठाकरेंना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं सांगत पाठिंबा दिलाय. रक्तानं लिहिलेलं पत्र शिवसैनिकानं जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Muralidhar Jadhav) यांच्याकडं दिलंय.

हेही वाचा: NCP : महाराष्ट्रात सत्ताबदल होताच राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!

हे पत्र उद्धव ठाकरे यांच्याकडं पाठविण्यात येणार आहे. या शिवसैनिकाच्या पत्राची परिसरात चांगलीच चर्चा रंगलीय. शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर नेत्यांची कोलांटउड्या इकडून तिकडं सुरु असल्या, तरी निष्ठावंत शिवसैनिक मात्र हे उघड्या डोळ्यानं पाहत आहे. मातोश्रीवरील शब्द शिरसावंद्य मानून जीवाची सुद्धा काळजी न करणारा शिवसैनिक शिवसेनेत चाललेल्या घडामोडीत चांगलाच भेदरून गेलाय.

हेही वाचा: तीन वर्षांत 3.9 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं, 48 लोक गेले पाकिस्तानात!

गेलेल्या अनेक सत्तापिपासू नेत्यांवर ते संतापही व्यक्त करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी नेते गोळा करण्यासाठी जाळे फेकले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांशी बैठकांचा धडाका लावलाय. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील टोप येथील सूरज पाटील या शिवसैनिकानं स्वत:च्या रक्तानं पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलाय. या शिवसैनिकाच्या पत्राची परिसरात चांगलीच चर्चा रंगलीय. पत्र देताना उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, तानाजी पाटील, राजू कोळी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shiv Sainik Of Kolhapur Supports Uddhav Thackeray By Writing A Letter With His Own Blood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top