

Passengers Suffer in Freezing Night as Bus Stalls Near Harsul Toll Plaza
Sakal
छत्रपती संभाजीनगर : नागपूरहून मुंबईकडे जाणारी संजय ट्रॅव्हल्सची खासगी बस समृद्धी महामार्गावर हर्सूल टोल नाक्याजवळ शनिवारी (ता. १४) पहाटे दोनच्या सुमारास अचानक बंद पडली. त्यामुळे बसमधील ४० प्रवाशांचे मोठे हाल झाले. रात्रभर थंडीत कुडकुडत आणि भीतीच्या छायेत प्रवाशांना रस्त्यावरच थांबावे लागले. महिला प्रवाशांची विशेष कुचंबना झाली असून, प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था उपलब्ध नव्हती.\