
छत्रपती संभाजीनगर : सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे यंदाही पर्यावरणपूरक पंढरपूर सायकल वारी उपक्रम राबविण्यात आला. यंदाचे हे चौथे वर्ष होते. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन असा संदेश घेऊन निघालेल्या या रॅलीमध्ये ५३ सायकलिस्ट सहभागी होते. त्यांनी ३३० किलोमीटर अंतर पूर्ण केले.