Chhatrapati Sambhajinagar : खंडणी न दिल्याने कपड्याचे दुकान पेटविले

पाच हजार रुपयांची खंडणी न दिल्याने सहा जणांनी कपड्याच्या दुकानमालकाला मारहाण करत दुकान पेटवून देत धुडगूस घातला.
Chhatrapati Sambhajinagar cloth shop fire
Chhatrapati Sambhajinagar cloth shop fireSakal

छत्रपती संभाजीनगर : पाच हजार रुपयांची खंडणी न दिल्याने सहा जणांनी कपड्याच्या दुकानमालकाला मारहाण करत दुकान पेटवून देत धुडगूस घातला. शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी पावणेसहा वाजता हा प्रकार लोटाकारंजा भागात घडला. घटनेत दुकानमालकाचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

वाजेद बाशवान अमर बाशवान (वय ३२, रा. लोटाकारंजा) यांनी तक्रार दाखल केली. बाशवान यांचे लोटाकारंजा भागात चाहत कलेक्शन नावाने कपड्याचे दुकान आहे. १३ एप्रिलला त्यांच्या दुकानात संशयित मुर्तूजाखान ऊर्फ अप्पी आणि इतर सहकारी आले. त्यांनी ‘रमजान महिना झाला, खूप धंदा केला आहे. आम्हाला पाच हजार रुपये दे’ अशी मागणी केली. बाशवान यांनी नकार देताच संशयित आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली.

तसेच इतर सहकाऱ्यांना बोलावून घेत दुकानातील सामान बाहेर फेकणे सुरू केले. यानंतर त्यांनी दुकानातील कपडे पेटवून देत आग लावली. याप्रकरणी संशयित आरोपी मुर्तूजाखान ऊर्फ अप्पी, वलीदखान, उनेसखान मुर्तूजा, अमन निसारखान, मुसाखान आणि अरबाज मोहम्मदखान (सर्व रा. लोटाकारंजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com