Sambhaji Nagar : मौजमजेसाठी चोरून विकायचे स्पोर्टस् सायकली

अल्पवयीन त्रिकूट ताब्यात : साडेसहा लाखांच्या ६३ सायकली जप्त
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : मौजमजेसाठी सायकली चोरुन त्याची कवडीमोल भावात विक्री करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, हे आरोपी स्पोर्टस् सायकली चोरत होते. या आरोपींच्या ताब्यातून साडेसहा लाखांच्या ६३ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

जवाहरनगर पोलिस ठाणे हद्दीतून काही महिन्यांपासून सायकली चोरीस जाण्याचे प्रकार घडत होते. या चोरीमध्ये गारखेडा भागातील तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असून हे आरोपी मंगळवारी इंदिरानगर भागात आल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. यावरुन पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींची चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्यांची कबुली दिली. सातारा, उस्मानपुरा, जवाहरनगर आदी पोलीस ठाणे हद्दीतून त्यांनी सायकल चोरीची कबुली दिली. घराच्या आडोशाला तसेच विक्री केलेल्या सायकल त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. एकूण सहा लाख ५९ हजाराच्या या ६३ सायकली आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त नवनित कॉवत, अेसीपी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन, गजेंद्र शिंगणे, संदिप क्षीरसागर जावेद पठाण, राजेश चव्हाण, श्रीकांत काळे, बाळासाहेब बैरागी, ज्ञानेश्वर शेलार आणि विजय सुरे यांनी केली.तिन्ही आरोपींच्या घरची परिस्थिती बेताची आहे. वर्षभरापासून त्यांनी सायकल चोरीला सुरुवात केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. साजापूर, क्रांतीनगर, वाळूज एमआयडीसी भागात या आरोपींनी लोकांना आपल्याला आर्थिक अडचण असल्याचे खोटे कारण दाखवत विक्री केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com