esakal | आईच्या मृत्यूनंतर तीन वेळेस गेला जीव द्यायला!

बोलून बातमी शोधा

Aurangabad news
आईच्या मृत्यूनंतर तीन वेळेस गेला जीव द्यायला!
sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: २० वर्षांचा सुमेर (नाव बदललेले आहे) अगदी चुणचुणीत, दिसायलाही देखणा; पण मागील काही महिन्यांपासून तो मानसिकदृष्ट्या चांगलाच खचला. शुक्रवारी (ता.३०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चक्क त्याने जीव देण्यासाठी सिडको उड्डाणपूल गाठला. तपासणी नाक्यावर असलेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन त्याचा जीव वाचविला. विशेष म्हणजे बरोबर महिन्यापूर्वी एक मार्च रोजी महावीर चौकातील उड्डाणपुलावरूनही उडी मारत असतानाच महिला पोलिस अंमलदाराने त्याला वाचविले होते. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याची ही त्याची तिसरी वेळ होती.

हेही वाचा: Corona Updates: चिंताजनक! मराठवाड्यात कोरोनाचे २४ तासांत सात हजार रुग्ण

महिन्यापूर्वी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आईच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या सुमेरने महावीर चौकातील उड्डाणपुलावरून उडी मारतानाच वेदांतनगर ठाण्याच्या अंमलदार स्वाती बनसोडे यांनी चालती दुचाकी तशीच सोडून देत उडी मारताना सुमेरला पकडून त्याचे जीव वाचविले होते. शुक्रवारी (ता.३०) सायंकाळी सुमेर हा नमाजला जातो म्हणून सिडको चौकातील उड्डाणपुलावर सायकलवर आला. पोलिस विरुद्ध दिशेने रिक्षाने त्याला वाचविण्यासाठी गेले, मात्र त्याने पुन्हा नाईक कॉलेजच्या बाजूने जात उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिस उपनिरीक्षक रतन डोईफोडे, सहायक फौजदार कानकाटे, सुभाष शेवाळे, सुखलाल सुलाने, सुरेश भिसे, श्याम जाधव, के. ए. मुंढे यांनी त्याला वाचविले अन् त्याच्या मामाच्या हवाली केले.

हेही वाचा: दोन्ही पाय तोडून शस्त्राने चिरला गळा; औरंगाबादमधील घटना

सेवाभावी संस्थेने घ्यावा पुढाकार

सुमेरला उपचार करण्यासाठी किंवा त्याचे मन परिवर्तन करण्यासाठी एखाद्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत महिला पोलिस अंमलदार स्वाती बनसोडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.