
लातूर : येथील इंडोमोबाइल सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), दोन महाव्यवस्थापकांनी सव्वा नऊ कोटींचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. आमदार अमित देशमुख यांची ही कंपनी आहे. यातील सीईओ राहिलेले सत्यजित देशमुख हे त्यांचे निकटवर्तीय आहेत. याप्रकरणी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हे प्रकरण मंगळवारी (ता. १५) आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.