AIFF : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ' स्थळ' चित्रपट सर्वोत्कृष्ट

९ व्या आंतरराष्ट्रीय अजिंठा- वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण कैलास पारितोषिक सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपट 'स्थळ' यास मिळाले.
9th ajanta verul international film festival best movie sthal director jayant digambar
9th ajanta verul international film festival best movie sthal director jayant digambarSakal

छत्रपती संभाजीनगर : ९ व्या आंतरराष्ट्रीय अजिंठा- वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण कैलास पारितोषिक सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपट 'स्थळ' यास मिळाले. चित्रपटाचे दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर आणि चित्रपटाच्या निर्मात्या शेफाली भूषण, यांना दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते मानचिन्ह देण्यात आले.

मंचावर फ्रिप्रेस्की इंडियाचे ज्युरी चेअरमन एन मनू चक्रवर्थी, महोत्सव संचालक अशोक राणे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ,विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, दिग्दर्शक जयंत सोमलकर, कुलपती अंकुश कदम,

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, भारतीय सिनेमा स्पर्धा गटाचे ज्युरी चेअरमन धृतिमान चॅटर्जी, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, दिग्दर्शक जयप्रद देसाई उपस्थित होते.

९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पारितोषिक विजेते

सुवर्ण कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपट) : स्थळ

दिग्दर्शक – जयंत दिगंबर सोमलकर

रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट अभिनेता - भारतीय चित्रपट ) : देवा गाडेकर (वल्ली)

दिग्दर्शक – मनोज शिंदे

रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्री - भारतीय चित्रपट ) : वर्षा. एस. अजित (वल्ली)

दिग्दर्शक – मनोज शिंदे

रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्री - भारतीय चित्रपट ) : नंदिनी चिकटे (स्थळ)

दिग्दर्शक – जयंत दिगंबर सोमलकर

रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्त्कृष्ट संहिता - भारतीय चित्रपट ) : नेलीयर कोथा ( दि नेलीए स्टोरी )

दिग्दर्शक – पार्थजित बरूह

स्पेशल ज्यूरी मेन्शन ( भारतीय चित्रपट ) : कायो कायो कलर? ( व्हीच कलर?)

दिग्दर्शक - शारूखखान चावडा

बेस्ट शॉर्ट फिल्म (मराठवाडा स्पर्धा) : दोन ध्रुव

दिग्दर्शक - हृषीकेश टी.दौड

मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा स्पेशल मेन्शन : नायिका

दिग्दर्शिक – श्रीया दीक्षित आणि रोहित निकम

मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा स्पेशल मेन्शन : इनफानाईट नाईटमेयर

दिग्दर्शक – दीपेश बीटके

एमजीएम शॉर्ट फिल्म स्पर्धा (बेस्ट शॉर्ट फिल्म ) : तलवार

दिग्दर्शक - सिद्धांत राजपूत

फ्रिप्रेसी इंडिया अवॉर्ड (सर्वोत्त्कृष्ट चित्रपट ) : स्वीट ड्रिम्स दिग्दर्शक – ईना सेंडीजरेव्हीक

फ्रिप्रेसी इंडिया स्पेशल मेन्शन : व्हेअर दि रोड लिड

दिग्दर्शक – निना ऑंजानोविक

फ्रिप्रेसी स्पेशल मेन्शन अवॉर्ड : वल्ली दिग्दर्शक – मनोज शिंदे

ऑडियन्स चॉईस अवॉर्ड (सर्वोत्त्कृष्ट चित्रपट ) : फालेन लीव्हस्

दिग्दर्शक – अकी कौरीसमकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com