Sambhaji Nagar : वाळूजमध्ये न्यायाधीशांच्या समितीने केली शाळेची पाहणी

एकसदस्यीय कमिटीने येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी समाधान आराख, विजय दोतोंडे, लक्ष्मण सद्भावे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य फैयाज कुरेशी, राहुल भालेराव उपस्थित होते.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

वाळूज : न्यायाधीशांच्या समितीने जिल्हा परिषदेच्या येथील शाळेला भेट देऊन गुरुवारी (ता. ११) पाहणी केली. या समितीत वैजापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. मोहिउद्दीन होते. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापक भगवान गवळी आणि ग्रामविकास अधिकारी उत्तमराव भोंडवे यांनी त्यांना यावेळी माहिती दिली.

राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा दिल्या जातात का किंवा त्यात काही उणिवा आहेत का, शाळेतील स्वच्छता गृह, परिसरातील स्वच्छता आदींबाबत नेमकी काय स्थिती आहे? वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फर्निचर, शिक्षकांची पुरेशी संख्या आहे का? परिसरातील व सभोवतालच्या स्वच्छतेसंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाची मदत कशी होते,

sambhaji nagar
Sambhaji Nagar : मराठवाड्यात सहा लाख घरांत विजेचा प्रकाश

याबाबत आलेल्या समितीने माहिती घेतली.

एकसदस्यीय कमिटीने येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी समाधान आराख, विजय दोतोंडे, लक्ष्मण सद्भावे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य फैयाज कुरेशी, राहुल भालेराव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com