Sambhaji Nagar : अपहरण करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

चाइल्ड हेल्पलाइनच्या मदतीने पीडितेची तेलंगणामधून सुटका
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

वाळूज महानगर : वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चाइल्ड हेल्पलाइनच्या मदतीने ही कारवाई केली. राजू प्रकाश काळे (वय २१, रा. नेहरूनगर, रांजणगाव, ता. गंगापूर) असे संशयिताचे नाव आहे.

पळसखेड नाईक (ता. बुलडाणा) येथी दांपत्य वाळूज औद्योगिक वसाहतीत कामगार असून ते शांतिनगर (रांजणगाव) येथे राहतात. दरम्यान, २६ डिसेंबरला त्यांच्या १२ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : सीसीटीव्ही असूनही पेट्रोल चोरी

तपास करत असताना पीडित मुलगी आणि तिचे अपहरण करणारा आरोपी राजू काळे हा तेलंगणात असल्याची माहिती मिळाली. यावरून निजामाबाद रेल्वे स्टेशन येथे चाइल्ड हेल्पलाइनच्या मदतीने शोध घेत ३१ डिसेंबरला संशयिताला ताब्यात घेतले. तसेच पीडितेची सुटका करून तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले.

प्राथमिक तपासात तरुणाने अत्याचार केल्याचे आढळले. संशयितास न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी आणि नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक डाके, महिला पोलिस अंमलदार प्रियांका तळवंदे, पोलिस अंमलदार संदीप गाडगे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com