Sambhaji Nagar : देवळाईत सर्वसामान्यांनी उभारले राजमाता जिजाऊंचे भव्य स्मारक

हे स्मारक विचारांचे, संघर्षाचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक महापुरुषाची जयंती नारायण नगरवासीयांतर्फे एकाच ठिकाणी साजरी करण्यात येते. लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण येथे एकत्र येतात
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : मोकळी जागा दिसली की, हडपण्याचा प्रकार सर्रास पहायला मिळतो. नारायणनगरातही अशाच एका मोकळ्या जागेवर अनेकांचा डोळा होता. त्या ठिकाणी मद्यपी, जुगाऱ्यांचा वावर होता. त्यामुळे देवळाई परिसरातील नारायण नगरातील नागरिकांनीच पुढाकार घेत या मोकळ्या जागेवर राजमाता जिजाऊ यांचे अर्धाकृती पुतळ्याचे स्मारक उभारले. जिजाऊंचे हे शहरातील पहिलेच स्मारक असल्याचा दावा स्मारक समितीचे प्रमुख नंदकुमार उढाण यांनी केला. लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या स्मारकापासून सांस्कृतिक आणि वैचारिक वसा जपण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

साधारणतः २०१९ मध्ये नारायणनगरातील ५० जणांनी एकत्र येत हे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये लोकसहभाग गोळा करीत या मोकळ्या जागेला कंपाउंड करण्यात आले.

हे स्मारक विचारांचे, संघर्षाचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक महापुरुषाची जयंती नारायण नगरवासीयांतर्फे एकाच ठिकाणी साजरी करण्यात येते. लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण येथे एकत्र येतात. हे स्मारक आमच्यासाठी ऊर्जा आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडल्यानंतर स्मारकाचे दर्शन घेऊन पुढील कामासाठी रवाना होतात, असेही उढाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com