Sambhaji Nagar : शहरात पूर आला, भूकंप झाला तर... ; तातडीच्या मदतीसाठी तयार होणार आराखडा

शहरात अतिवृष्टी होऊन पूर आला, भूकंप झाला किंवा गॅस गळतीसारखी महाभयंकर आपत्ती आली तर नागरिकांना तातडीने मदत मिळावी, कमीत कमी वित्त व जीवित हानी व्हावी, यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : शहरात अतिवृष्टी होऊन पूर आला, भूकंप झाला किंवा गॅस गळतीसारखी महाभयंकर आपत्ती आली तर नागरिकांना तातडीने मदत मिळावी, कमीत कमी वित्त व जीवित हानी व्हावी, यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. गेल्या दहा वर्षांतील नैसर्गिक, मानवनिर्मित संकटांचा वर्षभर अभ्यास केल्यानंतर हा आराखडा तयार केला जाणार असून, त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

शहरातील सिडको चौकात गॅसचा टॅंकर धडकल्याने त्यातून गॅस गळती झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. त्यानंतर संपूर्ण सिडको एन-३ परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला. महापालिका, पोलिस, अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्यांनी १२ तास शर्थीचे प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात शहरातील प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी (ता.७) पुन्हा बैठक झाली. युनायटेड डेव्हलपमेंट प्लान आणि राज्य शासनातर्फे शहरावरील नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती लक्षात घेऊन आराखडा तयार करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर, नाशिक व नागपूर शहराचा अशा प्रकारचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar : उद्योगांना विस्तारासाठी मिळेना जागा! ; गट नंबरमधील शेती विकत घेण्याची उद्योजकांवर वेळ

त्यानुसार आरएमएसआय व ॲल्युबियम या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार कंपन्यांतर्फे मागील दहा वर्षांत शहरावर आलेल्या संकटांचा अभ्यास करून कमीत कमी हानी व्हावी, यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. त्यात मोठे पूर, आगीच्या घटना, भूकंप, गॅसगळतींसह इतर आपत्तींचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

यावेळी आरएमएसआयचे डॉ. मुरली कृष्णा, वरिष्ठ अभियंता मोहम्मद जुनेद, पार्थ गोहेल, दिल्ली येथील आकाश मलिक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता ए. बी. देशमुख, नगर रचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, कार्यकारी अभियंता के. एम. फालक, आर. एन. संधा, अमोल कुलकर्णी, उपायुक्त अंकुश पांढरे, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख स्वप्नील सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com