टोपेंच्या आरोपाला अब्दुल सत्तारांचे उत्तर,म्हणाले- फोडाफोडी कशाला करु ? | Abdul Sattar In Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope And Abdul Sattar

टोपेंच्या आरोपाला अब्दुल सत्तारांचे उत्तर; म्हणाले...

औरंगाबाद : औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोमवारी (ता.१७) मेळावा पार पडला. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना धमकावतात आणि फोडाफोडी करतात असा आरोप केला होता. त्याला आज मंगळवारी (ता.१८) सत्तार यांनी उत्तर दिले आहे. माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी हा फक्त नावालाच आहे. येथे पक्षाची ताकद नाही. मग फोडाफोडी कशाला करु, असा सवाल त्यांनी टोपे यांना केला. औरंगाबाद (Aurangabad) येथे सिंचन विभागाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी (NCP) पक्ष प्रायव्हेट कॅरियर पार्टी झाली असल्याने आम्ही कार्यकर्ते फोडण्याचा विषय येत नसल्याचे सत्तार म्हणाले. (Abdul Sattar Attack On Rajesh Tope For False Allegation Making In Aurangabad)

हेही वाचा: मशिदींवरील भोंगे काढल्यास विरोध करणार; आठवलेंचा इशारा

गैरसमज झाला असल्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलू, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या राजकारणावर त्यांनी टीका केली. ठाकरे यांची १ मे रोजी होणारी सभा आणि भोंग्याचा मुद्दा म्हणजे बंद दुकान पुन्हा सुरु करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते पुन्हा अयोध्येला जात आहेत, असे सत्तार म्हणाले. अयोध्या पवित्र भूमी असल्याने त्यांना त्याबद्दल प्रेम आहे.

हेही वाचा: भोंग्याच सोडा शेतकऱ्यांच्या विजेच पाहा : राजू शेट्टी

अगोदर असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम भाजपची बी टीम म्हणून म्हटले जात असे. आता मनसे त्यांची सी टीम होत असल्याचा टोला सत्तार यांनी लगावला.

Web Title: Abdul Sattar Attack On Rajesh Tope For False Allegation Making In Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top