Abhijit Dipke Protest: दीपकेंविरोधात उपोषण करणाऱ्या दोघांचीही प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल करताच...

Two Protesters Hospitalised After Health Deteriorates: क्रॉकोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या कार्यपद्धतीविरोधात उपोषण करणाऱ्या दोन तरुणांची प्रकृती खालावल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Abhijit Dipke Protest

Abhijit Dipke Protest

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: क्रॉकोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांच्या कार्यपद्धतीविरोधात दोन तरुणांनी विभागीय आयुक्तालय परिसरात अन्नपाणी त्याग उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी दोन्ही तरुणांची तब्येत बिघडल्याने त्यांना पोलिसांनी सोमवारी (ता. दहा) शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) दाखल केले. हे दोन्ही तरुण अहमदाबादचे असून मनीष ब्रह्मभट आणि राहुल पंड्या अशी त्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com