Adarsh Patsanstha : ‘आदर्श’च्या १३ मालमत्तांचा पुन्हा लिलाव ; आतापर्यंत पाच मालमत्ता विक्रीतून आले अडीच कोटी

जिल्ह्यात गाजलेल्या आदर्श पतसंस्थेच्या गैरव्यवहारानंतर सहकार विभागाने या संस्थेच्या मालमत्ता विक्रीला काढल्या आहेत.
Adarsh Patsanstha
Adarsh Patsansthasakal

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गाजलेल्या आदर्श पतसंस्थेच्या गैरव्यवहारानंतर सहकार विभागाने या संस्थेच्या मालमत्ता विक्रीला काढल्या आहेत. यात १८ पैकी पाच मालमत्तांची विक्री झाली. अजूनही १३ मालमत्ता खरेदीसाठी कोणीच पुढे न आल्याने पुन्हा पाचव्यांदा १३ मालमत्तांची विक्री केली जाणार आहे.यासाठी प्रक्रिया सुरु केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते, जिल्हा विशेष परीक्षक सुरेश काकडे यांनी सोमवारी (ता.४) दिली.

पतसंस्थेच्या पाच मालमत्तेच्या विक्रीतून २ कोटी ५७ लाख १४ हजार रुपये मिळाले आहे.आदर्श पतसंस्थेत ५४ हजार ठेवीदारांच्या ३१ कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. सर्वांना पैसे परत मिळावेत यासाठी सहकार विभाग प्रयत्न करीत आहे.आतापर्यंत चार वेळा या मालमत्ता विक्रीसाठी काढल्या. त्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे या मालमत्ता विक्रीसाठी नव्याने प्रयत्न केले जात आहे.

दरम्यान लिलावाची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे. आतपर्यंत सिल्लोड येथील तीन मालमत्ता, शिवना येथील इमारत आणि कन्नड पिशोर येथील पतसंस्थेचे कार्यालयाची विक्री झाली आहे. यासह वसुलीवर विशेष भर देण्यात आल्याने आतापर्यंत पावणे दोन कोटींची वसुली करण्यात आली असून इतरांना नोटिस देण्यात येत असल्याचेही जिल्हा विशेष परीक्षक सुरेश काकडे यांनी सांगितले.

Adarsh Patsanstha
Sambhaji Nagar Crime : कंत्राटदाराला १ कोटी १५ लाखांचा घातला गंडा

बाजार समितीमधील गाळ्यांबाबतही विचार

पतसंस्थेच्या मालमत्तेचे छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत चार गाळे आहेत. यासह करमाड उपबाजार समितीत चार अशा एकूण आठ गाळ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. या गाळ्यांच्या माध्यमातून काही डिपॉजिटची रक्कम परत मिळेल का त्याचाही अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक सुरेश काकडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com