
..तर माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला? आदित्य ठाकरेंचा भावनिक सवाल
औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या बंडखरीनंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली, त्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून 'शिव संवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर फिरत असून ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते बंडखोर आमदारांवर कडाडून टीका देखील करत आहेत. आज औरंगाबाद येथे झालेल्या सभेत देखील त्यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला.
आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांबद्दल बोलताना म्हणाले की, हात जोडून सर्वांना शिवसैनिकांनी विचारावं गद्दरी का केली? ज्यांना ओळख दिली त्या उद्धव यांच्या पाठीत खंजीर का खुपसला? आम्ही जास्त दिल्यानं अपचन झालं, आता जेलुसिल घ्यायला तिकडे गेले, असा टोला आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लगावाला. ते पुढे म्हणाले की, मला अनेकांनी सांगितलं राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. देशभरात झालेल्या अनेक सर्व्हेमधून पुढं आलं आहे की, काम करणारा सीएम हीच उद्धव ठाकरेंची ओळख. आता आलेलं सरकार बेकायदेशीर, घटनाबाह्य आहे, यासोबतच त्यांनी हे सरकार लवकरच कोसळणार असे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या अख्यत्यारीतील खाती यांना दिली, पण तरीदेखील त्यांच्यात नाराजी होती, एवढं देऊनही माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला? असा घणाघात सवाल त्यांनी यावेळी बंडखोर आमदारांना केला, तसेच जिथे गेलात तिथे सुखात राहा, पण राहण्यासाठी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा. जनता ठरवेल ते मान्य असेल. यासोबतच त्यांनी फसवणूक झाली आणि पळवले असे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहेत आणि असतील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
संवाद यात्रेदरम्यान नाशिक येथे बोलताना आदित्य ठाकरे यांनी चाळीस गद्दारांवर एवढा विश्वास ठेवला, की त्यांना मिठी दिली; पण त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांनुसार चालणारे असल्याचे ते सांगतात अन् दुसरीकडे त्यांच्याच मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचतात. हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् निवडणुकीला सामोरे जा, असे अवाहन बंडखोर आमदारांना केलं.