विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ३० जुलैला

पदवी परीक्षांचा निकाल २५ जून ते ५ जुलै दरम्यान जाहीर होईल
Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad
Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabadsakal

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचा निकाल २५ जून ते ५ जुलै दरम्यान जाहीर होईल. तत्पुर्वी विद्यापीठाच्या विभागातील पदव्युत्तर प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीला २४ जूनपासून सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात वैय्यक्तिक माहीती; तर निकालानंतर ५ ते १५ जुलै शैक्षणिक माहीती विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. विद्यार्थ्यांचा वेळ वाचुन अडचणीमुक्त प्रवेशप्रक्रीयेचे नियोजन केल्याची माहीती प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली.

विद्यापीठाने नुकतेच संभाव्य शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, पदवी परिक्षांचे निकाल लवकर लावून प्रवेश प्रक्रीया, शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी वेळापत्रक विद्यापीठाकडून जवळपास निश्चित झाले आहे. त्यात प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीला २४ जूनपासून सुरू होईल.

५ जुलै ते १५ जुलै शैक्षणिक माहीती दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. ६ ते १८ जुलै अर्ज छाणणी प्रक्रीया समांतर पद्धतीने सुरू राहील. त्यातील आक्षेपांसाठी २० ते २० जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला. त्यानंतर गुणवत्तेनुसार इतर राज्य व इतर विद्यापीठाच्या प्रत्येकी दहा टक्के जागांसाठी प्रवेश २८ जुलै रोजी होतील. त्यानंतर त्या फेरीतील रिक्त जागांसाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच्या ८० टक्के जागांसाठी ३० ते ३१ जुलै रोजी प्रवेश प्रक्रीया होऊन १ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्र सुरू होईल. रिक्त जागा ३ ऑगस्ट रोजी जाहीर होतील. तर ७ जुलैला स्पॉट अॅडमीशनची प्रक्रीया संबंधीत विभागात होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com