esakal | दीड वर्षानंतर भरल्या शाळा, विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली जिल्ह्यात 22 शिक्षकांना कोरोना; शाळा सुरु होण्याआधी धक्का

दीड वर्षानंतर भरल्या शाळा, विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग सुरु

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : कोरोनाच्या Corona पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या लोहगाव (ता.पैठण) Paithan केंद्रातील आठपैकी चार माध्यमिक शाळांची गुरूवारी (ता.१५) घंटा वाजली. स्कूल चले हम या आनंदात कोरोना उपाययोजना करत विद्यार्थ्यांनी वर्गात ऑनलाईनऐवजी ऑफलाईन अभ्यासक्रमाला Offline Classes पहिल्याच दिवशी सुरवात केली. कोरोनामुक्त Aurangabad गावात शालेय व्यवस्थापन समिती व गावस्तरीय समितीच्या अनुमतीने माध्यमिक स्तरावरील आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा गुरूवारी भरण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लोहगाव Lohgaon जिल्हा परिषद प्राथमिक शाळा Zilla Parishad School केंद्राअंतर्गत येणाऱ्या आठ माध्यमिक शाळांपैकी जिल्हा परिषद शाळा तोडोंळी आठव्या वर्गातील (११पैकी ७), जिल्हा परिषद शाळा शेवता (२५ पैकी १०), दिन्नापूर जिल्हा परिषद शाळा (२० पैकी ४), तर खासगी अनुदानित मारोतराव पाटील विद्यालयात आठवीत (४५ पैकी १३),नववीत (५६पैकी ३),दहावी वर्गातील (६४ पैकी १२), विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी हजेरी लावली. after one and half year schools reopen in paithan of aurangabad district glp88

हेही वाचा: राजकारणात ज्याचा दोष नाही त्याला दोष दिला जातो, मुंडेंची खंत

तर लोहगाव प्रशाला, तारुपिपंळवाडी, गाढेगाव पैठण व खासगी अनुदानित तुकाराम विद्यालय ढाकेफळ येथील शाळा समिती व गावसमितीने बाहेर गावावरून येणारे शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी, संसर्ग प्रादुर्भाव, विद्यार्थी आरोग्य सुविधा आदी कारणाने शाळा सुरु करण्यास संमती नाकारल्याने आज या शाळाची घंटी वाजली नाही. शाळेच्या पहिल्याच दिवशी केंद्रप्रमुख मनोज सरग यांनी चारही शाळाना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क वापर, वर्गखोल्या सॅनिटायझ, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचा आढावा घेतला.

loading image