esakal | राजकारणात ज्याचा दोष नाही त्याला दोष दिला जातो, मुंडेंची खंत
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय मुंडे

राजकारणात ज्याचा दोष नाही त्याला दोष दिला जातो, मुंडेंची खंत

sakal_logo
By
प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : राजकारणात आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केल्यामुळे जनतेने डोक्यावर घेतले. राजकारणात कधीही दिखाऊपणा केला नाही. इथून पुढे येणारी प्रत्येक निवडणूक जिंकणार, असे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Dhananajay Munde यांनी व्यक्त केले. श्री. मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जगमित्र कार्यालयासमोर अभिष्टचिंतन सोहळा गुरुवारी (ता.१५) आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जगमित्र संपर्क कार्यालयासमोर वाल्मीक कराड यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर रुक्मीणबाई मुंडे, राजर्षी मुंडे, अजय मुंडे, वाल्मीक कराड, आदिश्री मुंडे आदी Beed परिवारातील सदस्य तसेच पदाधिकारी, नेते उपस्थित होते. dhananjay munde said, innocent people tainted in politics beed glp88

हेही वाचा: नांदेडची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल, तीन जण पाॅझिटिव्ह

अभिष्टचिंतन सोहळ्यात पुढे बोलताना मंत्री मुंडे म्हणाले की, वाढदिवस सोहळा कुठे साजरा करावा हा प्रश्न होता. मुलगी वैष्णवी अमेरिकेत आहे, तिकडे जावे का? पण अमेरिकेत गेले तर १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागते. त्यापेक्षा आपल्या मायभूमीत कायमस्वरूपी क्वारंटाइन होण्यास तयार आहे. म्हणून इथेच वाढदिवस साजरा केला. स्वतः जन्मावर स्वतः काय बोलावे हा प्रश्न आहे, जगात यापेक्षा कोणते अवघड काम नाही. मी राजकारण करत गेलो, अनेक सहकारी सोबत आले. मला नेता म्हणायला लागले. आमचा राजकारणात प्रामाणिकपणा आहे, म्हणून लोकांनी डोक्यावर घेतले. अनेक निवडणुका लढलो. पडलोपण. भविष्यात प्रत्येक निवडणूक जिंकणार आहे. तुमच्या विश्वासाने कोरोना काळात जिवंत ठेवले. समाजकारणात राजकारण केले नाही. समाजकारणच केले. सत्तेतील राजकारणात ज्याचा दोष नाही त्याला दोष दिला जातो. हे माझ्या बाबतीत घडले असेही मंत्री मुंडे म्हणाले.

हेही वाचा: पत्नीशी अश्लील बोलल्याने एकाचा खून, दोघांना बेड्या

प्रत्येकाचे उत्पन्न दुप्पट करणार

ज्या काळात लोक शिव्या देत होते त्यावेळी शरद पवार Sharad Pawar, अजित पवार Ajit Pawar यांनी मला विरोधी पक्षनेते पद दिले, हे कधी विसरणार नाही. मतदारसंघातील प्रत्येकाचे उत्पन्न दुप्पट करणार. परळी, अंबाजोगाई रस्ता, धर्मापुरी रस्ता केला. बायपास, एमआयडीसी आणली. आता मोठे उद्योग आणणार. नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. विकास हा जमिनीवर करावा लागतो. त्यामुळे भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खड्डे झाले आहेत; पण काम तर करावे लागेल. शहरात अभूतपूर्व काम करणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.

loading image